पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या... | Election Results

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे.   त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिली प्रतिक्रीया दिली असून जनतेचा कौल मी स्वीकारला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

परळी (बीड) : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे.   त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पहिली प्रतिक्रीया दिली असून जनतेचा कौल मी स्वीकारला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, मतदारांनी दिलेला कौल मी स्वीकारला असून मला निकाल मान्य आहे पण हा निकाल अनाकलनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यात गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती असून परळीत सर्वात धक्कादायक निकाल पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, परळीत विजयी जल्लोष सुरु असून परळीत धनंजय मुंडे यांचे पहिल्या फेरीपासून मताधिक्क्य सुरु असतानाच त्यांच्या विजयाची खात्री समर्थकांना होती. २० हजारांच्या पुढे मताधिक्क्य गेल्यानंतर परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरु केला. धनंजय मुंडे सुरुवातीपासून मतमोजणी केंद्रात होते. त्यांनीही गुलाल खेळून समर्थकांचा उत्साह वाढविला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde press Conference after she defeat in Parali VidhanSabha 2019