Vidhan Sabha 2019 : रक्ताची नातीच सर्वांत जास्त घाव करतात : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 October 2019

धनंजय मुंडे यांनी केलेली टीका ही माझ्या जीवनातील सर्वांत दुदैवी निवडणूक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज, पंकजा यांनी निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर रात्री त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला सहकुटुंब भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. 

बीड : धनंजय मुंडे यांनी केलेली टीका ही माझ्या जीवनातील सर्वांत दुदैवी निवडणूक असल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांची वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आज, पंकजा यांनी निवासस्थानी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर रात्री त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाला सहकुटुंब भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. 

पंकजा म्हणतात, 'मला अनेक भाऊ'
या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, 'माझ्यासाठी ही सर्वांत दुदैवी निवडणूक आहे. जर, माझ्या भावाच्या वक्तव्याचा मला इतका त्रास झाला तर, इतरांना किती झाला असेल. भावाने केलेला प्रकार दुदैवी आहे. पहिल्यांदा आपणच बोलायचं. त्यानंतर त्यावर खुलासा करण्यासाठी चार पत्रकारांना कॅमेरे घेऊन बोलवायचं हे योग्य नाही. भावाने माझ्याविषयी हे वक्तव्य केलं असलं तरी, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी मला फोन करून आम्ही तुझ्या सोबत आहे, असे सांगून धीर दिला आहे. त्यामुळे माझे महाराष्ट्रात अनेक भाऊ आहेत. या घटनेतून मी एकच बोध घेतलाय. जग खूपच वाईट आहे आणि या जगात रक्ताची नातीच सर्वांत मोठे घाव देतात.'

धनंजय मुंडेंची पत्रकार परिषद
धनंजय मुंडे यांच्या एका भाषणाची वादग्रस्त क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. त्यानंतर आज, सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यावर खुलासा केला. त्यावेळी त्यांनी 'शब्द टाकला असता तर, मतदारसंघ सोडला असता,' असे वक्तव्य केले. तसेच, केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मला राजकारणातून संपवण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaja munde reaction after dhananjay munde video controversy