Pankaja Munde : राख वाहतूक प्रदूषणकारी दिसल्यास कारवाई करू; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे स्पष्टीकरण
Ash Pollution : परळी वैजनाथ आणि परिसरात राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. राख वाहतूक करताना प्रदूषण होईल तर ट्रक मालक, चालकावर कारवाई होईल.
बीड : परळी वैजनाथ शहरासह परिसरात राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत पालकमंत्री असताना यापूर्वी कारवाई केली आहे. नियमाने राख उचलली जात नसेल, वाहतूक करताना ती झाकली गेलेली नसेल आणि प्रदूषणास कारणीभूत ठरत असेल तर कठोर कारवाई करू.