एकीशी साखरपूडा झाला, हुंडा घेतला अन् सातफेरे मात्र दुसरीशीच...

२१ ऑक्टोबर मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये डॉ संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले
crime in beed
crime in beedcrime in beed

परळी वैजनाथ (बीड): तुमच्या मुलीसोबत लग्न करतो, मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या असे म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्याने परळीतील मुलीसाठी तिच्या कुटुंबीयांकडे मागणी घातली. मात्र साखरपुडा झाला, हुंडा दिल्यानंतर त्याने परस्पर दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याच्या आरोपावरून मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून वैद्यकीय अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा येथील शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

येथील सोमेश्वर नगर परिसरातील डॉ. संदीप वसंतराव मंत्रे सध्या लातूर जिल्ह्यातील साकोळ (ता. शिरूर अनंतपाळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर २०२० संदीप त्यांच्या घरी आला. मी सध्या वैद्यकीय अधिकारी असून मला लातूरला हॉस्पिटल टाकण्यासाठी सात लाख रुपये द्या, मी तुमच्या मुलीशी लग्न करतो अशी त्याने मागणी घातली. मुलगा डॉक्टर आहे, स्वतः मागणी घालत असल्याने स्वतःच्या मुलीचे भविष्य चांगले होईल या आशेने वडिलांनी संदीप सोबत मुलीचे लग्न जमवले. २३ सप्टेंबर रोजी दोन्हीकडील काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला.

crime in beed
जालन्यातील 'त्या' पाच पोलिसांचे निलंबन मागे

२१ ऑक्टोबर मुलीच्या वडिलांनी ठरल्याप्रमाणे सात लाख रुपये संदीपच्या घरी नेऊन त्याच्या वडिलांकडे सुपूर्द केले आणि लग्न ५ मे २०२१ ला करण्याचे ठरले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नाची जोरदार तयारी सुरु केली. मंगल कार्यालय बुक झाले, लग्नपत्रिका छापल्या, इतर सर्व साहित्य खरेदी केले. मात्र, २३ मार्चपासून संदीपने त्याचा मोबाईल बंद केला. अखेर ४ एप्रिलला डॉ संदीपने त्याचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये सोशलमिडीयाचा माध्यमातून सांगून लग्नास नकार दिला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून डॉ. संदीप मंत्रे याच्यावर येथील शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com