
Bhum: परंडा विधानसभा मतदारसंघांमध्ये २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते यामध्ये महायुतीचे आरोग्य मंत्री प्रा डॉ .तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे माजी राहुल मोटे वगळता १९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे .या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आरोग्य मंत्री प्रा डॉ .तानाजी सावंत यांना १ लाख तीन हजार २५४ मतदान घेऊन सावंत विजय झाला आहे .
९ उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान झाले आहे .यामध्ये राष्ट्रीय समाज दल आर्यन राजे शिंदे ६०२,समाजवादी पार्टी ॲड . रेवण भोसले १६७,बहुजनमहा पार्टी शहाजहान पैगंबर शेख ११७ व सहा अपक्षांचा समावेश आहे . तर वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागुल यांना १२६९८ ,रासपाचे डॉ .राहुल घुले यांना २१७०, तर अपक्ष जमीलखा महेबूब पठाण उमेदवार यांचे चिन्ह ट्रम्पेट आहे .यांना ४४४६ मतदान पडले आहे .