परभणीत आशा स्वयंसेविकांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

Asha Swayamsevaks have agitated for various demands.
Asha Swayamsevaks have agitated for various demands.

परभणी : आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना वाढीव मानधनासह इतर विविध मागण्यांसाठी आयटक संघटनेतर्फे मंगळवारी (१३ आॅक्टोबर २०२०) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आंदोलन केले.

आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटने (आयटक)चे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरूड, राज्य संघटक विश्वनाथ गवारे, जिल्हाध्यक्ष संजीवनी स्वामी, जिल्हा संघटिका बानुजी शेख, आशा तिकडे, बाबारा आवरगंड आदींच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान सकाळी झालेल्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर आशा वर्कर, गटप्रवर्तक सहभागी झाले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आशा स्वयंसेविकांचे काम

आशा स्वयंसेविकांमुळे ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्याच्या सुधारणा होण्यास मदत होत आहे. अनेकदा ग्रामीण भागात संवाद नसतो, स्वत:च्या आरोग्याविषयी खुल्या मनाने बोलले जात नाही. मात्र आशा स्वयंसेविकांमुळे महिला आपल्या समस्या जाणीवपूर्वक त्यांच्यासमोर समस्या मांडत आहेत. ग्रामीण भागात पूर्वी आणि आताही हव्या तेवढ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे लहान मुलांना आवश्यक असणाऱ्या लसीकरणाच्या सुविधा, गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी वेळच्या वेळी होत असल्याने गर्भपाताचे प्रमाण कमी होत आहे. याशिवाय मासिक पाळीविषयीच्या समस्यांबाबतही महिला आता खुल्या मनाने बोलू लागल्या आहेत. 

अशा आहेत मागण्या

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये विविध मागण्या केलेल्या आहेत. त्यात आशा वर्कर यांचे वाढीव मानधन दोन हजार रुपयांसह गटप्रवर्तकाची तीन हजार, सर्वेचा प्रतीदिन ३०० रुपयांचा भत्ता तत्काळ खात्यात जमा करावा, आशा स्वयंसेविकांना दरमहा १८ हजार रुपये व गटप्रवर्तक यांना २१ हजार रुपये देण्यात यावे तसेच कायमस्वरूपी करण्यात यावे, आणि पीएसीवर एक रुम, टेबल, खुर्ची, आणि कॉ़म्प्युटर द्यावे. जिल्हा समन्वयक, संघटक व तालुका समन्वयक संघटक यांना ३० हजार रुपये मानधन देवून कायमस्वरूपी करावे, अंगणवाडीच्या पार्श्वभूमीवर असा प्रोग्राम वेगळा राबवावा, तालुका समन्वयक संघटक व जिल्हा समन्वयक संघटक यांना अशा कार्यक्रमाव्यतिरीक्त कोणतीही कामे लावू नयेत.

याशिवाय आशा स्वयंसेविकांना टी शर्टस्, कॅप्स, बॅच, हँडग्लोज, मास्क, सॅनिटायझर, स्टीकर्स व मार्कर पेन आदी साहित्य देण्यात आलेले नाहीत, ते त्वरित देण्यात यावे. शहरी आशा वर्कर यांना गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कामाचा मोबदला मिळाला नाही. तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, गणवेशासाठी रोखीने एक हजार रुपये देण्यात यावे, आरोग्य कर्मचारी शासकीय रुग्णालयातून रात्री - बेरात्री चांगली वागणूक देत नाहीत, त्याबाबत निर्देश देण्यात यावेत, डिलीव्हर घेऊन आल्यावर ए.एन.एम यांनी ताबडतोब आशा वर्कर यांना सही द्यावी, आदी मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केलेल्या आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com