परभणी कोविड रुग्णांसाठी अतिअद्यावत १०० खाजगी बेड उपलब्ध

गणेश पांडे
Tuesday, 15 September 2020

डॉ. प्रफुल्ल पाटील खासगी कोविड रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. ५० वरून आता १०० खाट कोविड बाधितांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी दिली.

परभणी : डॉ. प्रफुल्ल पाटील खासगी कोविड रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. ५० वरून आता १०० खाट कोविड बाधितांना दिल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी दिली. त्यात आय.सी.यु, स्पेशल रूम्स, विशेष कक्ष, कुटुंब कक्ष, बालकांसाठी कक्ष, २४ तास सीटी स्कॅन, पॅथोलॉजी, फार्मसी व अॅम्ब्युलन्स सेवा आदींचा समावेश आहे.  

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर आदी जिल्ह्यात कोविड रुग्णांना खाटांची कमतरता पडत आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी महानगरांमध्ये कोविड रुग्णांसाठी उपलब्ध खाटा व ऑक्सिजन पुरवठा हा चिंतेचा विषय आहे. परभणी जिल्ह्यात उपलब्ध खाटांच्या संख्येच्या निम्म्या खाटा फक्त कोविड रुग्णांसाठी उपयोगात येत आहेत. रुग्णसंख्या कमी असल्याने व होम क्वारन्टाईनचा पर्याय असल्याने परिस्थिती नियंत्रणात दिसत आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा, पालम, गंगाखेड या भागातील रुग्ण नांदेड जिल्ह्यांत धाव घेत आहेत. परभणी जिल्ह्यात शासकीय व खाजगी मिळून निम्मे बेड रिकामे आहेत. परंतु भविष्यात परभणीमध्ये विपरित परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भविष्यात जिल्ह्याची गरज पाहता डॉ. प्रफुल्ल पाटील खाजगी कोविड रुग्णालयाने आपल्या खाटांची संख्या ५० वरून १०० वर नेली आहे. 

त्यामुळे एका अद्यावत खाजगी रुग्णालयात परभणीकरांसाठी १०० बेड त्यात आय.सी.यु, स्पेशल रूम्स, विशेष कक्ष, कुटुंब कक्ष, बालकांसाठी कक्ष, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा आहार, समुपदेशन, योगा व मेडीटेशन, २४ तास सीटी स्कॅन, पॅथोलॉजी, फार्मसी व अॅम्बुलन्स सेवांचा समावेश आहे.  रुग्णालयाने १०० खाटांसाठी स्वत:चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, लिक्वीड क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट व आगाऊ गरजेसाठी जम्बो सिलेंडरची उपलब्धता देखील रुग्णालयाच्या परिसरातच उपलब्ध करून दिली आहे.  

सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध... 

कोविड रुग्णांच्या १०० खाटा व्यतिरिक्त इतर सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टीसुपरस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि.च्या १०० खाटा, ५ ऑपरेशन थेटर्स, अँन्जीओग्राफी, अँन्जीओप्लास्टी, डायलिसीस, लॅप्रोस्कोपी, अर्थ्रोस्कोपी आदी टर्शरी सेवा उपलब्ध आहेत. कोविड व नॉन कोविड मिळून २०० खाटांची उपलब्धता या रुग्णालयात उपलब्ध असल्याचे संचालिका डॉ. विद्या प्रफुल्ल पाटील म्हणाल्या. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Parbhani 100 private beds will be provided for Covid patients