esakal | परभणी : ७०ः३० आरक्षण सुत्र रद्द, साठ हजारावर विद्यार्थी परतीच्या मार्गावर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

साठ हजारावर विद्यार्थी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे होणारी अब्जावधीची उलाढाल तर बंद होणारच आहे, त्याच बरोबर पालकांना बसणारा आर्थिक भूंर्दंड देखील वाचणार आहे.

परभणी : ७०ः३० आरक्षण सुत्र रद्द, साठ हजारावर विद्यार्थी परतीच्या मार्गावर

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठीचे गेल्या २५-३० वर्षापासून मराठवाड्यासह विदर्भावर अन्याय करणारे ७०ः३० चे सुत्र अखेर मंगळवारी (ता. आठ) विधीमंडळाने रद्द केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात प्रवेश घेतलेले मराठवाड्यातील साठ हजारावर विद्यार्थी परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे होणारी अब्जावधीची उलाढाल तर बंद होणारच आहे, त्याच बरोबर पालकांना बसणारा आर्थिक भूंर्दंड देखील वाचणार आहे.

वैद्यकीय प्रवेशासाठी ७०ः३० च्या सुत्रामुळे व पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्याजागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मराठवाड्यातून हजारो विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रातसह विदर्भातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात. मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या सोलापुर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव यासह विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात हे प्रवेश होत असत. बहुतांश विद्यार्थी हे दहावी नंतर अकरावी व बारावीचे शिक्षणासाठी याच जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत असत.

हेही वाचा दीड टक्क्याचा मोह पडला भारी, महिला उपजिल्हाधिकाऱ्याला अटक...

शेकडो एजंटामार्फत प्रवेश

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना खेचण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात एजंट देखील सक्रीय होते. अशा शेकडो एजंटा मार्फत बहुतांश प्रवेश निश्चित होत असता. एक वर्षासाठी किमान २० ते २५ हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असे. एकदा प्रवेश निश्चित झाला

की विद्यार्थी थेट परीक्षेलाच हजेरी लावत व या दरम्यान आपल्या सोयीच्या ठिकाणी कोचिंग क्लासेस करीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह प्रात्यक्षिक परीक्षा देखील संबंधीत 'मॅनेज' करीत असल्याचे समजते. न कॉलेजचे, न पिरीयड्सचे टेंशन. प्रात्यक्षिकाचे गुण देखील पैकीच्या पैकी मिळत असल्याचे बोलले जाते.

हजारो विद्यार्थी परतीच्या मार्गावर

दरवर्षी मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात अकरावीचे २५-३० हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. बारावीसह ही विद्यार्थी संख्या ६० हजारापेक्षा अधिक होते. प्रत्येक्षाचा किमान ४० हजार रुपये खर्च धरला तरी ही रक्कम दोन अब्जापेक्षा अधिक होते. ही उलाढाल आता बंद होणार असल्याचे चित्र असून त्या भागातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना देखील टाळे लागण्याची शक्यता नाकारात येत नाही. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांच्या चार-दोन खोल्यात थाटलेल्या दुकानदाऱ्या देखील बंद होणार आहेत. अशी माहिती देखील सुत्रांनी दिली.

येथे क्लिक करा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांची बैठक बोलविणार, परभणीचे खासदार देणार लढा

पाल्यांचे प्रवेश मराठवाड्यातच घेण्यासाठी आग्रही

७०ः३० च्या आरक्षण सुत्रामुळे गुणवत्ता असूनही जागांची संख्या कमी असल्यामुळे मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ७० टक्क्यांमध्ये प्रवेश मिळत नव्हता तर पश्चिम महाराष्ट्रात जागा अधीक असल्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांचे प्रवेश पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात घेत होते. परंतु आता हे सुत्र रद्द होऊन अन्याय दुर झाला आहे. अनेक पालक आता शुल्क परत मिळो अथवा न मिळो, आपल्या पाल्यांचे प्रवेश मराठवाड्यातच घेण्यासाठी आग्रही आहेत.

- बालासाहेब उध्दवराव फड, पालक, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे