परभणी : पूर्णा येथून युवकाचे अपहरण करुन खून करणारा आरोपी अटक- विशेष पोलिस पथकाची कारवाई

file photo
file photo

परभणी : दोन वर्षापुर्वी बीड जिल्ह्यातील परळी (वै) येथील अजय अशोक भोसले (वय १७) याचे पुर्णा रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करुन त्याचा परळी येथे नेऊन निर्घुण खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची आॅनर किलींग प्रकरण घडले होते. या प्रकरणातील फरार आरोपीस विशेष पोलिस पथकाने परळी भागातून अटक गुरुवारी (ता. दहा) केली. त्याला परळी पोलिसांच्या स्वाधीन केले.

आपल्या मुलाचे अपहरण केल्याच्या संशयावरुन सदरील मुलाची आई मंगलबाई भोसले यांनी संभाजीनगर पोलीस ठाणे, परळी येथे पाच जणांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा परळी पोलिसांनी ता. पाच ५ मार्च २०१९ रोजी पुर्णा पोलिसांकडे वर्ग केला. या गुन्ह्याचे तत्कालीन तपास अधीकारी फौजदार चंद्रकांत पवार यांनी तपासाची चक्रे फिरवत यातील अपहृत तरुण अजय भोसले याचा शोध सुरु केला. तपासात त्यांना अजयचा प्रेमप्रकरणातुन अपहरण करुन त्याचा निर्घुण खून करुन त्याचा मृतदेह परळी शहराबाहेर अज्ञातस्थळी पुरुन ठेवल्याचे अवघ्या महीन्याभरात उघडकीस आणले. ता. २५ मार्च रोजी फौजदार श्री. पवार यांनी अजय भोसले खून प्रकरणात अपहरणासह कलम ३०२, १२० (ब),भादंवी गुन्ह्यात अट्राॅसिटी कायद्यान्वये ३ (२) (५) नुसार वाढ करत एकूण सहा आरोपी निष्पन्न करुन रुजूबाई बावरी, शक्तीसिंग बावरी, बच्चनसिंह बावरी, चरणसिंग बावरी यांच्या सह त्या मुलीसही ताब्यात घेत परळी शहरालगत मोकळ्या जागेतून अजयचा मृतदेह शोधून काढला होता. 

या आॅनर किलींग प्रकरणात अजय भोसलेची प्रियसी आरतीकौर हीने याप्रकरणानंतर काही दिवसांतच चार एप्रील २०१९ रोजी आत्महत्या केली. तर शक्तीसिंग बावरी, बच्चनसिंग बावरी, चरणसिंग बावरी हे आजही परभणी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असुन या गुन्ह्यातील घमंडसिंघ सूरजसिंघ जुंनी व राजूसिंघ बावरी हे दोघे फरार होते. तपासा दरम्यान काहीं दिवसात फौजदार चंद्रकांत पवार यांची बदली झाली. या घटनेस जवळपास दोन वर्षांचा कालावधी होत असताना सदरील आरोपी  पुर्णा पोलिसांना गुंगारा देत होते.

सदरील गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आरोपी घमंडसिंघ सूरजसिंघ जुंनी हा नुकताच परळी येथे आला असल्याची खात्रीलायक माहिती परभणी पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकास मिळाली. यावरुन फौजदार चंद्रकांत पवार, विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहूल चिंचाणे, शंकर गायकवाड, अजहर पटेल, विष्णु भिसे यांच्या पथकाने तातडीने परळी वैजनाथ शहर गाठले. गुरुवारी (ता. १०) रात्री नऊ वाजेच्या सुमारास परळी रेल्वे पुलाखाली पथकाने सापळा लावला. काही वेळातच आरोपी घमंडसिंघ जुंनी यास पथकाने झडप मारुन त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यास ताब्यात घेऊन थेट पुर्णा पोलिस ठाणे गाठून रितसर पुर्णा पोलिसांच्या स्वाधीन केले. आता या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे बाकी आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com