esakal | परभणी : नऊ महिण्यानंतर ग्रंथालयांना विस टक्केच अनूदान मिळाले.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मानवाचे 'ग्रंथ'च खरे गुरू,मित्र व मार्गदर्शक आहेत.ज्यांच्याकडे नाही पुस्तकांचे कपाट ते होतील भूईसपाट.अशा सुभाषितांनी महाराष्र्टात ग्रंथालयांची महिमा जपली जाते.

परभणी : नऊ महिण्यानंतर ग्रंथालयांना विस टक्केच अनूदान मिळाले.

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (जिल्हा परभणी)  : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये 'कोरोना' च्या कालावधित बंद होती. ग्रंथालयांना 'कोरोना' या रोगाचे नियम व अटि लागु करून शासनाने ग्रंथालये सुरू करण्याची परवानगी दिली. सप्टेंबर- २०२० या महिण्यात देण्यात येणार्‍या ग्रंथालयाचा अनूदानाचा पहिल्या हप्ता केवळ विस टक्केच अनूदान देवून राज्यातील ग्रंथालयाची शासनाने थट्टाच केली असल्याचे ग्रंथालय चालकांतून बोलले जात आहे.                            

मानवाचे  'ग्रंथ'च खरे गुरू, मित्र व मार्गदर्शक आहेत. ज्यांच्याकडे नाही पुस्तकांचे कपाट ते होतील भूईसपाट.अशा सुभाषितांनी महाराष्र्टात ग्रंथालयांची महिमा जपली जाते. या ग्रंथालयांना हालाकीचे दिवस आले असून ग्रंथालयात वाचकांना सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांनाही गेल्या नऊ महिण्यापासून पगार ( मानधन ) मिळाले नाही. मात्र त्यानंतरही केवळ विस टक्केच अनूदान मिळाल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 'कोरोना' रोगामूळे राज्यातली सार्वजनिक ग्रंथालये गेल्या ( ता. २२) मार्च- २०२० महिण्यापासून बंद करण्यात आली होती. सहा महिण्यानंतर ( ता.१५ ) आॅक्टोंबरपासून ग्रंथालयांना शासनाने नियम व अटीनूसार उघडण्याची परवागी दिली. नियम व अटिंच्या आधिन राहून राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात आली.

हेही वाचा परभणी : हातावर पोट असणार्‍या कुटुंबाचे जगणे झाले मुश्किल- कोरोनाच्या काळात काम नाही हाताला

तेंव्हापासून वाचकांना तेथिल कर्मचारी सेवा देत आहेत. राज्यातील ग्रंथालय कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी नसल्यामूळे कर्मचार्‍यांना अगदी तूटपूंज्या पगार ( मानधन ) यावरच काम करावे लागते. ग्रंथालयांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून त्या प्रमाणात वर्षातून दोन वेळा शासन अनूदान देते. त्यातील पन्नास टक्के कर्मचारी पगार ( मानधन ) यावर तर उर्वरित पन्नास टक्के ग्रंथ खरेदी, मासिके,पेपर ,रूम भाडे, स्टेशनरी, सांस्कृतिक कार्यक्रम यावर खर्च करण्यात येतात. दिवाळी पूर्वी ग्रंथालयांना पन्नास टक्के अनूदानाची अपेक्षा होती. परंतू ते अनूदान न मिळाल्याने दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली. नऊ महिण्यानंतरही ग्रंथालयांचा अनूदानाचा पहिला पन्नास टक्के हप्ता न मिळाल्याने राज्यातील ग्रंथालयांची दूरावस्था  झाली आहे. त्यामुळे तुटपूंज्या अनूदानावर चालणारी ग्रंथालये अडचणीत सापडली आहे. त्यामुळे ग्रंथालय चालकात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

राज्यातील ग्रंथालयाला यावर्षीचा पहिला हप्ता पन्नास टक्या एैवजी केवळ वीस टक्केच अनूदान मिळाल्याने ग्रंथालय चालकांना अडचणीना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. शासनाने ग्रंथालयांचे उर्वरित अनूदान तत्काळ द्यावेअशी प्रतिक्रिया महाराष्र्ट राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ. रामेश्वर पवार यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image