
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विविध महाविद्यालयांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कृषी शिक्षण अधिस्वीकृती समितीने ‘अ’ दर्जा मानांकन बहाल केले आहे. ही अधिस्वीकृती एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२८ या कालावधीसाठी वैध असून, विद्यापीठास उच्चांकी ३.२१ गुण मिळाले आहेत.