बॉयोमिक्सच्या विक्रीतून परभणी कृषी विद्यापीठाने रचला इतिहास  

गणेश पांडे 
Tuesday, 20 October 2020

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउन असुनही एप्रिलपासून आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स मिश्रणाची १७० मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री होऊन दोन कोटी ५६ लाखांचा महसूल विद्यापीठास प्राप्‍त झाला.

परभणीः यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउन असुनही एप्रिलपासून आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स मिश्रणाची १७० मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री होऊन दोन कोटी ५६ लाखांचा महसूल विद्यापीठास प्राप्‍त झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठापासुन विक्रमी महसूल प्रथमच प्राप्‍त झाल्याची माहिती कुलगुरु डॉ.अशोक ढवण यांनी दिली. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभागात विविध पिकांकरिता उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जीवाणुंचे मिश्रण असलेल्या बॉयोमिक्‍सची या आर्थिक वर्षात दोन कोटी ५६ लाखाची विक्रमी विक्री झाली. यानिमित्त बायोमिक्‍स विक्री लक्षपुर्ती सोहळा व द्रवरूप ट्रायकोडर्मा माऊफंगचे उद्‍घाटन कार्यक्रम सोमवारी (ता.१९) झाला. 

हेही वाचा - आमचे घर पाण्यात गेले हो, गोकुळबाईंनी मांडली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कैफियत -

जैविक उत्‍पादके मराठवाड्यात विक्रीकरिता उपलब्‍ध होणार 
कुलगुरू डॉ.अशोक ढवण म्‍हणाले, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाउन असुनही एप्रिलपासून आजपर्यंत विद्यापीठ निर्मित बॉयोमिक्‍स १७० मेट्रिक टन अशी विक्रमी विक्री होऊन दोन कोटी ५६ लाखांचा महसूल विद्यापीठास प्राप्‍त झाला. विद्यापीठाच्‍या इतिहासात केवळ एका निविष्‍ठापासून विक्रमी महसूल प्रथमच प्राप्‍त झाला आहे. बॉयोमिक्‍स पिक वाढीकरिता वरदान ठरत असुन बॉयोमिक्‍सला शेतकरी बांधवांमध्‍ये मोठी मागणी आहे. राज्‍यातुनच नव्‍हे तर परराज्‍यातुनही शेतकरी बांधव लांबच लांब रांगा लावुन बॉयोमिक्‍स खरेदी करतात, ही विद्यापीठावरील दर्जेदार निविष्‍ठांवर असलेला शेतकरी बांधवाचा विश्‍वास आहे. लवकरच बियाणे विक्री प्रमाणे विद्यापीठ विकसित बॉयोमिक्‍स व इतर जैविक उत्‍पादके मराठवाडयातील विविध जिल्‍ह्यात विक्रीकरिता उपलब्‍ध करण्‍यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - वसुलीसाठी बँकांचा एकही माणूस शेतकऱ्यांकडे फिरकला नाही पाहिजे, याची खबरदारी सरकारने घ्यावी -

काय आहे माऊफंग  ? 
माऊफंग हे एक जमिनीतील उपयुक्‍त सुक्ष्‍म बुरशी व जिवाणुंचे अनोखे मिश्रण असून या मिश्रणामध्‍ये ट्रायकोडर्माच्‍या विविध प्रजाती तसेच सुडोमोनास फ्ल्‍युरोसन्‍स या उपयुक्‍त जीवाणुचा समावेश आहे. माऊफंग मुळे पिकावरील मर, रोपावस्‍थेतील मर, आले व हळदीवरील कंदकुज व पानावरील करपा या रोगांचा बंदोबस्‍त होतो. बियाण्‍यांद्वारे उत्‍पन्‍न होणाऱ्या बुरशीजन्‍य रोगांचा प्रतिबंध होण्‍यास या मिश्रणाचा उपयोग होतो. या मिश्रणाचा उपयोग भाजीपाला पिके, फळपिके, तृणधान्‍य, गळितधान्‍य, कापसु, उस या सारख्‍या पिकांसाठी करता येतो. या मिश्रणाच्‍या वापरामुळे झाडांची व रोपाची वाढ चांगल्‍या प्रकारे होऊन झाड सशक्‍त बनते व उत्‍पादनात वाढ होते. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani Agricultural University made history by selling biomics, Parbhani News