Parbhani News: परभणीतील उष्णतेचा कहर; एप्रिल तापमान ४४ अंशांवर पोचले; शेतकरी आणि नागरिक त्रस्त; उष्णतेच्या लाटेचा वाढता परिणाम
Impact on Agriculture and Livestock: परभणी जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमान सातत्याने ४० अंश सेल्सिअसवरून वरच राहिले आहे. यंदा १४ एप्रिल रोजी ४४.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.
परभणी: जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील तापमानाने गेल्या पाच वर्षांत सातत्याने उच्चांक गाठला असून, यंदा जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता अधिकच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांसह शेतकरीवर्गही चिंतेत सापडला आहे.