Parbhani Car Accident: वसमत-परभणी महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत तीन ठार
Parbhani Accident: वसमत–परभणी महामार्गावर झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. क्रेटा कारचालक फरार झाला असल्याने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
ताडकळस (जि. परभणी) : वसमत-परभणी महामार्गावर दोन कारची शनिवारी (ता. सहा) पहाटे समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण ठार; तर दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.