esakal | परभणीत : सट्टेबाजार अटकेत, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त- विशेष पथकाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ऑस्ट्रेलिया देशात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमधील ॲडीलेट हॉर्बटविरूध्द सिडनी स्टायलर टिमवर सट्टा....! विशेष पथकाने धाड टाकून चार सट्टेबाजांसह तीन लाख आठ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल घेतला ताब्यात.

परभणीत : सट्टेबाजार अटकेत, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त- विशेष पथकाची कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : मंगळवार (ता. १५) डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरातील परभणी- गंगाखेडकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुस कालिका मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम सोनी- १० या चॉयनलवर ऑस्ट्रेलिया देशात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमधील ॲडीलेट हॉर्बटविरूध्द सिडनी स्टायलर टिममधील लायु क्रिकेट सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा नावाचा जुगार खेळ खेळणाऱ्या बुक्कीवर पथकाने कारवाई करीत चार सट्टेबाजांना अटक करुन त्यांच्याकडून १० मोबाईल, तीन दुचाकीअसा तीन लाख आठ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. 

शहरात मागील काही दिवसांपासून क्रिकेटवर सट्टा चालवणारी सट्टेबाजांची टोळी कार्यरत असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र होत होती. त्यामुळे पोलिस प्रशासन कमालीचे सतर्क झाले होते. त्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटनासाठी स्थापन केलेले विशेष पथक पाळत ठेवून होते. विशेष पथकातील परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक बापूराव दडस, पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले यांच्यासह पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, राहुल चिंचणी, शंकर गायकवाड, जमीर फारुकी, आजहर पटेल, विष्णू भिसे, दिपक मुदीराज यांनी गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवार (ता. १५) डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कारवाई केली.

तीन लाख आठ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त

शहरातील परभणी- गंगाखेडकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुस कालिका मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत काही इसम सोनी- १० या चॉयनलवर ऑस्ट्रेलिया देशात सुरु असलेल्या बिग बॅश लीगमधील ॲडीलेट हॉर्बटविरूध्द सिडनी स्टायलर टिममधील लायु क्रिकेट सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा नावाचा जुगार खेळ खेळणाऱ्या बुक्कीवर पथकाने कारवाई करीत चार सट्टेबाजांना अटक करुन त्यांच्याकडून १० मोबाईल, तीन दुचाकीअसा तीन लाख आठ हजार ८०० रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला. 

हे आहेत सट्टेबाजार

परभणी शहरात विशेष पथकाने क्रिकेट सट्टेबाजांच्या विरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या गणेश माधवराव पांचाळ रा. यशवंतनगर परभणी, गोविंद दामोधर आबूज रा. कल्याणनगर परभणी, सचिन श्रीरंगराव बनसोडे रा. शिवरामनगर परभणी, किशोर श्रीकिशन तोष्णीवाल रा. शिवरामनगर परभणी यांच्या विरोधात कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image