

Parbhani News
esakal
परभणी: एकीकडे देशभर इंधन बचतीचे संदेश दिले जात आहेत, सरकारी यंत्रणांकडून काटकसरीच्या गप्पा मारल्या जात आहेत; मात्र दुसरीकडे शहरात राज्य परिवहन महामंडळ आणि शहर वाहतूक पोलिसांनी काढलेला नवाच फंडा बसचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी जिंतूर, मानवत, पाथरी, गंगाखेडकडे जाणाऱ्या बसला दीड किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारण्याची सक्ती करण्यात आली असून त्यामुळे इंधनासह वेळेचाही मोठा अपव्यय होत आहे.