Parbhani : चुकीच्या माहितीमुळेच मुख्यमंत्री आले नाहीत ; आमदार गुट्टे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळेच परभणी जिल्ह्यात आले नाहीत,
Ratnakar Gutte
Ratnakar Gutteesakal

परभणी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या माहितीमुळेच परभणी जिल्ह्यात आले नाहीत, असा खळबळजनक आरोप गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी रविवारी (ता. १२) केला.

परभणी येथे ११ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्‍घाटन रविवारी सकाळी झाले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे जबाबदारी आहे. स्वागताध्यक्षपदाचे भाषण करताना आमदार श्री. गुट्टे यांनी त्यांच्यावरील झालेल्या गुन्ह्याचे स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, ‘‘हे प्रकरण गेल्या चार-पाच वर्षांपासूनचे आहे. आता त्यात सीबीआयने गुन्हे नोंद केले आहेत. परंतु, त्याच प्रकरणाची चुकीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोचविण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यापर्यंत पोचविली त्यामुळेच मुख्यमंत्री या जिल्ह्यात आले नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com