esakal | परभणी :  वालूर गावात हेरिटेज वारीयर्स स्थापन करुन सिध्दराम बादशहा मठाची केली साफसफाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सेलू तालुक्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या वालुर येथील प्राचीन, ऐतिहासिक व रहस्यमयी गुफांनी युक्त वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना व  श्रद्धास्थान असलेल्या सिद्धराम बादशहा मठ संस्थानमधुन साफसफाईस सुरुवात करण्यात आली.

परभणी :  वालूर गावात हेरिटेज वारीयर्स स्थापन करुन सिध्दराम बादशहा मठाची केली साफसफाई

sakal_logo
By
संजय मुंडे

वालूर ( जिल्हा परभणी ) : वालूर (ता.सेलू) गावात ' हेरिटेज वारीयसर्स स्थापण करुन गावातील पुरातन वास्तू तसेच आपल्या वारसास्थळांची साफसफाई करण्याचा संकल्प करीत या उपक्रमाची सुरुवात रविवारी (ता. सात) ऐतिहासिक असलेल्या सिद्धराम बादशहा मठापासून करण्यात आली. 

सेलू तालुक्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या वालुर येथील प्राचीन, ऐतिहासिक व रहस्यमयी गुफांनी युक्त वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना व  श्रद्धास्थान असलेल्या सिद्धराम बादशहा मठ संस्थानमधुन साफसफाईस सुरुवात करण्यात आली. दरम्यान रविवार हा श्रमदानाचा पहिलाच दिवस. जवळपास १६ तरुणांनी एकत्र जमून 'हेरिटेज वारीयर्स' म्हणून नोंद करुन अडीच तास श्रमदान दिले. आजच्या पहिल्याचं दिवशी मठाच्या शिखरासह परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी समाधीस्थळ शिखरावरील आढाव गवत, झाडे- झुडपे काढून शिखर स्वच्छ करण्यात आले. कचरा बाजूला करुन या वारसा स्थळांना मोकळा श्वास दिला. 

हेरिटेज वारीयर्स तर्फे पुढील कामाची चर्चा करण्यात आली. या तरुणांनी भविष्यातील प्रत्येक कार्यात सहभागाची ग्वाही यावेळी दिली. यात बालाजी हारकळ,दामोदर पांढरे, शुभम डुमे, ओंकार केशरखाने, आशिष देशमाने, अशोक कोरडे, संदीप डाके, सिद्धांत सिनगारे, अक्षय परभणीकर, शामराव पवार, बाळासाहेब केशरखाने, भगवान मगर, कार्तिक थोरात, अनिकेत केशरखाने, आदित्य मगर, सतिष केशरखाने आदी तरुणांनी सहभाग घेतला. या वेळी रमाकांत चौधरी, गुरुलिंग महाराज, पिंटु क्षिरसागर, मुन्ना गवळी या ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. 

वालूर येथील तरुणांनी एकत्र येऊन प्राचीन वारसा जोपासण्यासाठी हेरिटेज वारीयर्स ची स्थापना केली. त्यांनी सिध्दराम बादशहा मठापासून कामाचा श्री गणेशा केला. आपण भारावून गेलो असुन तरुणांचे कार्य लोकचळवळ बनावी ऐतिहासिक वारसा असलेल्या वालूर गावाच्या नाव महाराष्ट्राच्या पटलावर यावे ही अपेक्षा.   
- रमाकांत हनुमंतराव चौधरी, जेष्ठ नागरिक, वालूर

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image