esakal | परभणी : सेलूत चार जिल्हांतून कापसाची आवक - दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावर्षी अतिवृष्टीमूळे शेतकर्‍यांच्या कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापूस वेचणीसाठीही शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली. किरकोळ बाजारात शेतकर्‍यांच्या  कापसाची चार हजार दोनशे रूपयांपासून पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी कवडीमोल केला जात होता.

परभणी : सेलूत चार जिल्हांतून कापसाची आवक - दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी) : शहरात कापूस खरेदी परिसरासह चार जिल्हातून मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होत आहे. तब्बल दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली असल्याची माहिती येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी दिली. 

यावर्षी अतिवृष्टीमूळे शेतकर्‍यांच्या कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापूस वेचणीसाठीही शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली. किरकोळ बाजारात शेतकर्‍यांच्या  कापसाची चार हजार दोनशे रूपयांपासून पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापूस खरेदी कवडीमोल केला जात होता. त्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदीची प्रतिक्षा कापूस उत्पादक शेतकर्‍यांना होती. ( ता.१९ ) नोव्हेंबरपासून  शहरातील एक आणि वालूर येथील एका अशा दोन जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. टप्प्या टप्प्याने सीसीआयने कापूस खरेदी केंद्र वाढवत कमाल दर पाच हजार ७२५ रुपये प्रति क्विंटल असा शेतकर्‍यांना मिळाला. त्यामुळे सेलू बाजार समीतीच्या कापूस यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाचे वाहने दाखल होत आहेत.

हेही वाचा -  मित्राचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, अंबाजोगाईचे चार युवक जागीच ठार

सेलू परिसरासह परभणी,जालना,बिड व हिंगोली या चार जिल्ह्यातून कापूस विक्रीसाठी सेलूत येत आहे. त्यामुळे बाजार समीतीच्या कापूस यार्डात वाहनाच्या रांगाच रांगा लागत आहेत. शहर व तालुक्ययातील आठ कापूस जिनिंग सद्य:स्थितीत सुरू आहेत. सीसीआयकडून मनजित, बीबीसी, नूतन, स्वस्तीक,  मधुसुदुन, ग्लोबल ,सर्मथ, माऊली, तिरूपती या जिनिंगवर कापूस खरेदी केली जात आहे.कापसाच्या प्रतवारी नुसार सीसीआयकडून कापूस खरेदी केली जात आहे. सभापती दिनकर वाघ उपसभापती सुंदर गाडेकर व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या शेतकर्‍यांना सुविधा देण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कापूस विक्री करतांना शेतकर्‍यांनी स्वत: उपस्थित राहावे. स्वत: उपस्थित नसल्यास कुटूंबातील सदस्याने आधार कार्ड व  शिधापञिका घेऊन उपस्थिती राहवे.असे अवाहन बाजार समितीचे सचिव प्रकाश पौळ यांनी केले. 

शहरातील आठ जिनींग कापूस खरेदी करत आहेत.जिल्हाभरात सगळ्यात मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी येथे होत आहे.त्यामुळे शेतकर्‍यांत आनंद आहे.बाजार समितीकडून वीस एक्करचा यरिया वाहनांसाठी उपलब्ध करून दिला आहे.त्यातील दहा एक्करच्या जागेचा भाडेकरार केला असून शासन त्यास विलंब लावत आहे.तसेच हंगामी कर्मचार्‍यांनाही शासन विलंब करत असल्याची नाराजी बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांनी व्यक्त केली आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे