

Parbhani Cotton News
esakal
सेलू,: अमेरिका-इराण युद्धामुळे परदेशात कापसाची मागणी वाढली आहे. एक खंडीचा दर (दोन गाठी) ५३ हजारांवरून ५७ हजारांपर्यंत पोहोचला. यामुळे कापसाला मागणी वाढली आहे. बुधवारी (ता. १) कापसाला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्केट यार्डात खासगी व्यापाऱ्यांकडे क्विंटलमागे ८ हजार ४०० ते ८ हजार ४७५ रुपये भाव मिळाला. मात्र, या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. कारण शेतकऱ्यांकडे कापूसच शिल्लक नसल्याचे चित्र तालुक्यासह जिल्हाभरात आहे.