Parbhani Crime News
esakal
प्रेमभंग आणि नातेवाईकांचा विरोध युवकाच्या मानसिक तणावाचा मुख्य कारण ठरला.
मृत युवकाने रेल्वेखाली उडी घेतली; आत्महत्येपूर्वी भावनिक संदेश दिला.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
परभणी : सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे रविवारी रात्री उशिरा एक धक्कादायक (Love Tragedy Parbhani) घटना घडली. प्रेमसंबंधातील नैराश्यामुळे माणिक कारभारी खोसे (वय २५) याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर भावनिक संदेश टाकून आपली मानसिक वेदना व्यक्त केली होती.