esakal | परभणी : कोविड कर्मचाऱ्यांना एनएचएममधून नियुक्त्या देण्याची मागणी

बोलून बातमी शोधा

file photo}

जिल्ह्यात कोविड काळात आरोग्य कर्मचारी म्हणून स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, एक्स रे टेक्नीशियन, वार्ड बॉय, सफाई कामगार या पदावर जिल्हा रुग्णालय, आयटीआय कोविड सेंटर येथे यापूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती एका खासगी संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे.

परभणी : कोविड कर्मचाऱ्यांना एनएचएममधून नियुक्त्या देण्याची मागणी
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोना सारख्या महामारीत काम करणाऱ्या कोविड योध्दाना खासगी संस्थेद्वारे नियुक्ती न देता 'एनएचएम' मधून नियुक्त्या देण्यात याव्यात असी मागणी या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता.आठ) जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यातील कर्मचाऱ्यांनी थेट पीपीई किट घालूनच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

जिल्ह्यात कोविड काळात आरोग्य कर्मचारी म्हणून स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशियन, एक्स रे टेक्नीशियन, वार्ड बॉय, सफाई कामगार या पदावर जिल्हा रुग्णालय, आयटीआय कोविड सेंटर येथे यापूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती एका खासगी संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे. शासनाकडून नविन भरती जीईएम पोर्टल ने निविदा मागवून खासगी संस्थेद्वारे कुठलीही शैक्षणिक आर्हता नसतानाही जिमेदार पदावर नवनियुक्त उमेदवाराकडून आर्थिक देवाण - घेवाण करून नियुक्त्या दिल्या जात असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

पद भरतीसाठी संस्थेकडून पैशाची मागणी

खासगी संस्थेला केवळ कुशल व अकुशल कामगार जसे वॉर्ड बॉय, सफाई कामगार यांची भरती करता येते. व एनएचएम च्या पत्रानुसार यापूर्वी कोविड अंतर्गत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने भरती करण्याचे आदेश असतांना श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विसेस ही संस्था मनमानी कारभार करून व आर्थिक देवाण - घेवाण करून तांत्रिक पदाच्या कर्मचाऱ्यांची भरती करत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

तांत्रिक पदे भरण्याचा अधिकार संस्थेला नाही

जीईएम पोर्टलद्वारे खासगी संस्थेला स्टाफ नर्स, लॅब टेक्नीशीयन, एक्स रे टेक्नीशीयन इत्यादी तांत्रिक पदे भरता येत नाहीत असे सांगत या सर्व पदाकरिता पैशाची मागणी सदरील संस्था करत असल्याचा गंभीर आरोप ही या निवेदनात करण्यात आला आहे. पैसे दिल्याशिवाय या पदावर कामच करू शकणार नाही व तुम्हाला ऑर्डर मिळणार नाही असे धमकी वजा सुचना देखील श्री स्वामी समर्थ मल्टी सर्विसेसकडून दिल्या जात आहेत असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

अशी होतेय आर्थिक पिळवणुक

पद एनएचएम वेतन संस्थेचे वेतन

स्टाप नर्स 20 हजार रुपये 10 हजार रुपये

टेक्नीशियन 17 हजार रुपये 9 हजार रुपये

वॉर्डबॉय 12 हजार रुपये 6 हजार रुपये

या सर्वबाबीची चौकशी झाली पाहिजे. आम्ही जिवाची पर्वा न करता कामे केली आहेत व करत आहोत. सर्व कर्मचाऱ्यांना एनएचएमच्या नियमाप्रमाणे भरती करून घ्यावे व वेतन द्यावे अशी आमची मागणी आहे.

- निवेदनकर्ते कर्मचारी

संपादन- प्रल्हाद कांबळे