परभणी : ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

file photo
file photo
Updated on

सेलू (जिल्हा परभणी) ः कोरोना काळात राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये बंद होती. ग्रंथालयांना नियम व अटी लागु करून ग्रंथालये शासनाने सुरू करण्याची परवानगी दिली. सप्टेंबर महिण्यात देण्यात येणारा अनूदानाचा ग्रंथालयाचा पहिला हप्ता शासनाने न दिल्याने कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण पगाराविणा साजरा करण्याची वेळ आली आहे.  

ग्रंथालये विद्यादानाचे पवित्र मंदिरे आहेत. मानवाचे ग्रंथच खरे गुरू, मित्र व मार्गदर्शक आहेत. ज्यांच्याकडे नाही पुस्तकांचे कपाट ते होतील भूईसपाट, अशा सुभाषितांनी ज्या ग्रंथालयांची महिमा जपली जाते. अशा ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिण्यापासून पगार (मानधन) नसल्यामूळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार असल्याचे चित्र आहे. कोरोनामूळे राज्यातली सार्वजनिक ग्रंथालये गेल्या (ता.२२) मार्चपासून बंद करण्यात आली होती. तब्बल सहा महिण्यानंतर (ता.१५) ऑक्टोबरपासून ग्रंथालयांना नियम व अटीनूसार उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियम व अटींच्या अधिन राहून राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात आली. ग्रंथालयांच्या वाचकांना तेथील कर्मचारी सेवा देत आहेत.

आठ महिण्यापासून पगार नाही 

राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी नसल्यामूळे अगदी तूटपूंज्या पगार (मानधन) यावर काम करावे लागते. ग्रंथालयांची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून त्या प्रमाणात वर्षातून दोन वेळा शासन अनूदान देते. त्यातील पन्नास टक्के कर्मचारी पगारावर तर उर्वरित पन्नास टक्के ग्रंथ खरेदी, मासिके, पेपर, रूम भाडे, स्टेशनरी, सांस्कृतिक कार्यक्रम यावर खर्च करण्यात येतात. अवघ्या पंधरा दिवसांवर आलेल्या दिवाळी सणासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिण्यापासून पगार न मिळाल्याने मुलांना नवीन कपडे, फटाके, मिठाई घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसल्यामूळे दिपावली अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. दिपावली पूर्वी ग्रंथालयांच्या पहिल्या हप्त्याचे अनूदान शासनाने जमा करावे अशी मागणी ग्रंथालय कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

अनूदानाचा पहिला हप्ता जमा करावा

राज्यातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना दिवाळी हा सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी शासनाने दिवाळीपूर्वी राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा अनूदानाचा पहिला हप्ता जमा करावा.  

- डॉ. रामेश्वर पवार, अध्यक्ष, राज्य ग्रंथालय संघ. 
         
संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marriage Fraud
Children of endlife-Affected Farmers from Ardhapur Taluka Pay an Inspiring Visit to NDA
Village Pride Shines in Moscow: Dr. Abhishek Borude Completes MBBS in Russia
Centuries-Old Heritage Under Threat; Preservation Plea for Ardhapur’s Historic Artifacts
Marathi News Esakal
www.esakal.com