Alandi Temple : संत ज्ञानेश्वरांच्या मंदिराला चांदीचा दरवाजा;परभणीतील डॉक्टर दांपत्याकडून दान, ११ किलो चांदीचा वापर
Silver Door Donation : परभणीचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम मसलेकर आणि डॉ. पद्मजा मसलेकर यांनी आळंदीतील ज्ञानेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला. आरोग्य तपासणी शिबिरानंतर हा भक्तीमय उपक्रम राबवण्यात आला.
परभणी : परभणी येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम मसलेकर व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मजा मसलेकर या सेवाभावी दांपत्याने श्रीक्षेत्र आळंदीतील श्री ज्ञानेश्वर माउली मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यास ११ किलो वजनाचा चांदीचा दरवाजा अर्पण केला.