परभणी : जनतेला वेठीस धरु नका, वाढीव वीज बिले मागे घ्या - प्रविण दरेकर

गणेश पांडे
Monday, 23 November 2020

आघाडीतल्या पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणासाठी जनतेला वेठीला धरु नका, वाढीव वीज बिलं ताबडतोब मागे घ्या. असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सोमवारी (ता.23) परभणीत दिला.

परभणी ः कोरोना काळात अगोदरच होरपळलेल्या जनतेला महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल पाठवली, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, तोच रोष भाजप आंदोलनाच्या माध्यमातून सरकारसमोर व्यक्त करतं आहे, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, आघाडीतल्या पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणासाठी जनतेला वेठीला धरु नका, वाढीव वीज बिलं ताबडतोब मागे घ्या. असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सोमवारी (ता.23) परभणीत दिला.

परभणी भाजपच्यावतीने विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरण कार्यालय समोर वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, माजी आमदार मोहन फड, प्रदेश सदस्य विलासराव रबदडे, प्रदेश सदस्य अभय चाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह मोठ्या संख्ये भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचाआगामी दोन महिण्यात राज्यात भाजपचे सरकार- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

ऊर्जामंत्री व मुख्यमंत्री बैठक घेऊन १० मिनिटात या प्रश्नावर तोडगा काढू शकतात. परंतु काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये विसंवाद आहे, उर्जा खाते काँग्रेसकडे असल्यामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्री. दरेकर यांनी यावेळी केला. हे सरकार गोंधळलेल्या अवस्थेत व भांबावलेलं आहे. सरकारच्या या कारभारामुळे जनतेमध्येही गोंधळ उडाला आहे.  या सरकारला कोरोनाचे नियोजन जमले नाही. फक्त लाईव्ह संवाद मध्ये जनतेला संदेश द्यायचे. उपाययोजनाबाबत मुख्यमंत्री भाष्य करताना दिसत नाही असा आरोप ही त्यांनी यावेळी केला.

जनता आज कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडली आहे. अशा स्थितीत जर महावितरणकडून हजारोंजी वीज बिले पाठविण्यात येत आहेत.  ही बिले भरणे राज्यातील जनतेला परवडणारी नाहीत, त्यामुळे सरकारच्या या जुलमशाहिचा निषेध करण्यासाठी वीजेच्या बिलाची होळी करण्यात आली आहे असेही श्री. दरेकर म्हणाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Don't hold the people hostage, withdraw the increased electricity bills Pravin Darekar parbhani news