परभणी : अकरा वर्षानंतर पुलाच्या कामाला मुहूर्त लागला

विलास शिंदे
Wednesday, 23 December 2020

सन २००९—१० या वर्षी दूधना नदिवरिल मोरेगाव- खुपसा दरम्यान निजामकालिन जिर्ण अवस्थेत असलेल्या पूर्वीच्या पुला एैवजी नविन पुलाला मंजूरी मिळाली होती.दूधना नदिवरिल जूना निजामकालिन पूल कमी उंचीचा असल्याने तसेच पावसाळ्यामध्ये या पुलावरून बरेचदा पाणी वाहत असल्यामूळे नागरिकांना प्रवास करता येत नव्हता.

सेलू ( जिल्हा परभणी ) : सेलू- देवगाव ( फाटा ) राज्य रस्ता क्रमांक २२१ या रस्त्यावरिल दूधना नदीवरिल मोरेगाव जवळील नविन पुलाचे बांधकाम गेल्या अकरा वर्षापूर्वी केले असूनही केवळ दूतर्फा रस्ता भरणी व पुलावरिल कारपेटचे काम शिल्लक राहिल्याने हा पुल रहदारीस सुरू न झाल्याने वाहनधारकांना निजामकालीन जून्या रस्त्यावरूनच रहदारी करावी लागत होती.परंतु जानेवारी- २०२१ या महिण्यात पुलाचे राहिलेले काम पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली आहे.

 

सन २००९—१० या वर्षी दूधना नदिवरिल मोरेगाव- खुपसा दरम्यान निजामकालिन जिर्ण अवस्थेत असलेल्या पूर्वीच्या पुला एैवजी नविन पुलाला मंजूरी मिळाली होती.दूधना नदिवरिल जूना निजामकालिन पूल कमी उंचीचा असल्याने तसेच पावसाळ्यामध्ये या पुलावरून बरेचदा पाणी वाहत असल्यामूळे नागरिकांना प्रवास करता येत नव्हता.त्यामूळे पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटायचा.लोअर दूधना प्रकल्प धरणातून पावसाळ्यात दूधना नदितून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामूळे कित्येकदा जूना पुल पाण्याखाली जात होता.जूना निजामकालिन पुल हा मोडकळीस आला असल्याने या पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाल्यामूळे नविन पुलासाठी सुरूवातीस तिन कोटी पन्नास लाख रूपये मंजूर झाले.त्यामध्ये नविन पुलाचे अर्धवट काम झल्याने हा पुल रखडला होता.

हेही वाचा -  परभणी : कोव्हीड लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा सज्ज- जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतिने या पुलाच्या उर्वरित कामासाठी पुरवणी यादी करून अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसाठी पाठविले होते.पुरवणी मागणीमध्ये पाच कोटी पन्नास लाख रूपयांचा निधी उर्वरित कामासाठी मंजूर झाला.या पुलाचे काम तब्बल अकरा वर्षानंतर पूर्ण होत आहे.मात्र सद्य:स्थितीत वाहनधारकांना जून्याच निजामकालिन जिर्ण झालेल्या पुलावरून जिव मुठित धरून ये—जा करावी लागत आहे.

दूधना नदिवरिल मोरेगाव- खुपसा दरम्यान असलेल्या नविन पुलाचे राहिलेले काम येत्या ( ता. एक ) जानेवारी २०२१ पासून सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता पी. एन. कोरे यांनी दिली.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Eleven years later, the bridge work started parbhani news