
तालुक्यात होत असलेल्या ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकित ३१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने गिरगाव, चिकलठाणा ( बु.), देऊळगाव ( गात ),हातनूर,हादगव ( पावडे ),खादगाव ( भाबट ),गव्हा, गुळखंड, चिकलठाणा ( खु. ), वाई,बोथ, शिराळा, गोमेवाकडी, पिंपळगाव आदी ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे.
सेलू ( जिल्हा परभणी) : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीसाठी (ता. १५) जानेवारी रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी गावागावत कोणत्या वार्डातून कोणाला उभे करायचे याची चाचपणी सुरू झाल्याने गावातील पुढारी आपल्या फायद्यासाठी घराघरात भांडणे लावण्याचे काम करतांना दिसत आहेत. त्यामूळे घरातली मंडळीच आपली दूश्मन झाली की काय असा विचार घरातील कुटूंब प्रमुखांना पडला आहे.
तालुक्यात होत असलेल्या ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकित ३१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने गिरगाव, चिकलठाणा ( बु.), देऊळगाव ( गात ),हातनूर,हादगव ( पावडे ),खादगाव ( भाबट ),गव्हा, गुळखंड, चिकलठाणा ( खु. ), वाई,बोथ, शिराळा, गोमेवाकडी, पिंपळगाव आदी ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे.
हेही वाचा - ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव : डॉ. संजीव बंटेवाड
यासाठी २०५ वार्डातून ५१९ सदस्य निवडले जाणार आहेत.यासाठी ( ता.१५ ) डिसेंबर रोजी यादी प्रसिध्द झाली असून ( ता.२३ ) डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज स्विकरण्यात येणार आहेत.तर ( ता.१५ ) जानेवारी— २०२१ रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी ग्रामपंचातीचे पॅनल प्रमुख चांगलेच कामाला लागले आहेत.तालुक्यातील काही विद्यमान व माजी पदाधिकार्यांनी गावपातळीवर आपले वजन शाबुत राहावे यासाठी जोरदार तयारी सूरू केल्याचे दिसत आहे. गावात वास्तव्यास असणार्या गोरगरीब मतदारांचा निवडणूक झाल्यावर तब्बल पाच वर्षे विचार न करणारे त्यांच्या सुख दूखात केंव्हाच सहभागी न होणारे.केवळ आपले पोट भरण्यासाठी गाव सोडून शहराच्या ठिकाणी राहणार्या गावातील मतदारांना ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी त्यांचे मत आपल्याच पारड्यात घेण्यासाठी गाव पातळीवरचे पुढारी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला की, त्यांची आस्थेने विचारपूस करून वेळ प्रसंगी मतदरांची संख्या पाहून आर्थिक मदत करणार असल्याचे बोलून दाखवत असतांना गावागावात दिसत आहेत.
भावाभावत दूश्मनी वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे
ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत आपल्या गावातील कोणत्या वर्डातील मते आपल्याला पडणार आणि कोणते मते विरोधकांना पडतील याचे गणित जुळवतांना गाव पुढारी व्यस्त आहेत.जे मते आपल्या उमेदवारांना पडणार नाहित त्यांच्या घरातील अन्य मतदारांना आपल्या जवळ करण्याचा फंडा पुढारी करित असल्याने घराघरात भावाभावत दूश्मनी वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे