

Parbhani Farmers Struggle With Night Power Supply
परभणी : पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासह खरीप पिके संकटात आली आहेत. उपलब्ध विहीर, बोअर किंवा अन्य जलस्रोतांतील पाण्यावर पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच, कृषिपंपांसाठी होणारा रात्रीचा वीजपुरवठा त्यांच्या अडचणीत आणखी भर घालत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले असले, तरी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना आजही मध्यरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे.