परभणी : सेलू उपजिल्हा रूग्णालयातील उद्यान ठरतेय वरदान

file photo
file photo

सेलू (जिल्हा परभणी) : शहरात पर्यावरणाच्या रक्षणासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतिने येथिल उपजिल्हा रूग्णालयात गेल्या चौदा महिण्यापूर्वी राबविलेल्या घनदाट जंगलाने चांगलेच बाळशे धरले असून त्याचा उपयोग 'कोराना'च्या काळात येथिल रूग्णांना नॅचरल अाॅक्सिजनसाठी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना यामूळे हे रूग्णालय वरदान ठरत अाहे. 

सततचा पडणारा दुष्काळ लक्षात घेता शहरात पाणी बचत जनजागृती मोहीम अंतर्गत जलपुर्नभरण करण्यासाठी घरोघरी भेटी देवून नागरिकांचे पर्यावरणाविषयी प्रबोधन करत 'एक कुटुंब एक रोप' हि संकल्पना शहरी भागात झाडे  संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील तज्ञ मार्गदर्शक,निसर्गप्रेमी नागरिक यांची बैठक मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या वतिने आयोजित करून सर्वांची मते जाणून घेतली.कमी जागेत,कमी वेळेत,जास्त झाडे विकसित करण्याचे तंत्रज्ञान जपान येथील शास्त्रज्ञ डॉ.अकिरा "मियावकी" यांनी अंमलात आणून जगभर पसरत चाललेली संकल्पना पाहून मोरया प्रतिष्ठाणच्या टीमने हि संकल्पना शहरात राबविण्याचे ठरवले.यासाठी  शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पडीक असलेल्या जागेसाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.संजय हरबडे यांना विनंती केली. त्यांनी तत्काळ होकार दिला.व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

२०१९ रोजी १००८ रोपांचे "झाडाचं जंगल" विकसित करण्याचे ठरवले

औरंगाबाद येथील वन संरक्षक श्री. गुदगे यांचे मार्गदर्शन घेत जागेची आखणी,मातीत टाकण्याचे शेणखत,तांदूळ भुसा,कोकोपीटचे मिश्रण,झाडांची निवड,रोपांचे वर्गीकरण,लागवड पद्धत,जीवामृत प्रक्रिया आदी. येथील विविध सामाजिक संस्था,महिला मंडळ, रुग्णालय कर्मचारी, निसर्गप्रेमी नागरिकांना एकत्र करत हा उपक्रम लोकसहभागातून पूर्ण करण्याचे प्रतिष्ठानच्या वतिने ठरवून (ता.३०) जून —२०१९ रोजी १००८ रोपांचे "झाडाचं जंगल" विकसित करण्याचे ठरवले.पूर्व तयारीसाठी जवळपास दोन महिने परिश्रम घेतल्यामुळे प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांना एक वेगळाच आनंद झाला.

"मियावकी" पद्धतीबद्दल अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले

झाडांच्या लागवडीनंतर खरी अग्नी परीक्षा होती ती लावलेल्या झाडांच्या संगोपनाची याची जबाबदारी मोरया प्रतिष्ठानचे सहकारी व उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी यांनी घेतली. दरदिवशी प्रकल्पस्थळी येवून झाडांना ठिबकद्वारे पाणी देत झाडांच्या मुळाशी नारळाच्या शेंड्या आणून आच्छादन प्रक्रिया पूर्ण केली. अवघ्या सहा महिन्यात एक फूट असलेल्या रोपाचे रूपांतर सहा ते सात फुटांपर्यंत झाल्यामुळे या "मियावकी" पद्धतीबद्दल अनेक निसर्गप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पर्यावरणाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी निसर्गप्रेमी एकत्र

(ता.२२) मार्च—२०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे व सर्वत्र कोरोनामूळे  लॉकडाऊन असल्यामुळे योग्य संगोपन केल्यामुळे एका वर्षात सर्वच्या सर्व १००८ रोपांचे रूपांतर वृक्षात होवून जवळपास बारा फूट उंचीचे वृक्ष सहस्त्र घन वन प्रकल्पात आज डौलत आहेत.उपजिल्हा रुग्णालयात कृत्रिम ऑक्सिजन घेण्यापेक्षा या वृक्षापासून मिळणारा नैसर्गिक प्राणवायू बहुमोल असून पर्यावरणाचा समतोल अबाधित ठेवण्यासाठी निसर्गप्रेमी एकत्र येत असल्याचे चित्र येथिल उपजिल्हा रूग्णालय परिसरात दिसत आहे.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळच १००८ झाडांचे जंगल निर्माण

प्रत्येकाला जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.कुठलेही झाड हे ऑक्सिजन हवेमध्ये सोडतो व ते आपल्यासाठी आवश्यक आहे.तसेच पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी सुद्धा झाडांची आवश्यकता आहे. या मुळेच आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळच १००८ झाडांचे जंगल निर्माण केलं आहे.जेणे करून जनमानसात एक चांगला संदेश जाऊन झाडे लावण्याची प्रेरणा मिळेल.

- डाॅ.संजय हरबडे, वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय, सेलू

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com