

Parbhani News
esakal
परभणी: उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आणि गुढीपाडव्याचा सण पार पडताच दरवर्षीप्रमाणे यंदाही धान्य खरेदीला वेग आला आहे. वर्षभरासाठी धान्य साठवण्याची पारंपरिक पद्धत अजूनही कायम असल्याने बाजारपेठेत रविवारी (ता.२९) ग्राहकांची मोठी गर्दी होती. शहरातील नवा मोंढा परिसरातील धान्य बाजारात सध्या ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे.