
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सावंगी (भां) येथील कैलास गजानन भांबळे (वय ३२) हा घुटखा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती
जिंतूर (जिल्हा परभणी) - शासनाने विक्रीस बंदी केलेल्या गुटख्याचा अवैध साठा सावंगी-भांबळे (ता. जिंतूर) शिवारात एका शेतातील आखाड्यावर गुरुवारी (ता. ३१) सायंकाळी पाचच्या सुमारास बामणी पोलिसांनी धाड टाकून एक लाख लाख ३९ हजार ३०० रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार सावंगी (भां) येथील कैलास गजानन भांबळे (वय ३२) हा घुटखा विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्त.यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड यांनी सहाय्यक फौजदार मोईनोद्दीन पठाण व ए. एस. पवार, सतीश मोरे, मनोज राठोड, जे. के. चोपडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून कैलास भांबळे यांच्या शेतातील आखाद्यावर छापा टाकला. एक लाख ३९ हजार ३०० रुपये किंमतीचा गोवा, वजीर व इतर प्रकारचा गुटखा आढळून आला. तो जप्त करण्यात आला असून संशयित आरोपी कैलास भांबळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - परभणी महापालिका जानेवारीत अतिक्रमण हटाव मोहिम राबवणार
गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पना राठोड ह्या करीत आहेत. पोलिस निरीक्षक कल्पना राठोड ह्या पंधरा दिवसापूर्वी बामणी पोलिस स्टेशन येथे रुजू झाल्या आहेत. तेंव्हापासून त्यांनी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील असोला कवडा, सावंगी, करंजी, कावी आदी ठिकाणी बेकायदेशीर चालत असलेल्या देशीदारू विक्री करणारांवर धाडी टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
संपादन - प्रल्हाद कांबळे