Parbhani News: वर्दळीच्या ठिकाणी मोबाइल व्हॅन; पथकेही कार्यान्वित; परभणी शहरात उष्माघात प्रतिबंधासाठी महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा झाली सज्ज

Mobile Health Teams Deployed in Crowded Areas: परभणी महानगरपालिकेने उष्माघात प्रतिबंधासाठी आरोग्य पथके आणि ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित केले.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: वाढत्या तापमानाच्या तीव्रतेमुळे शहरात उष्माघात प्रतिबंध आणि तातडीच्या उपचारांसाठी मनपाची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेच्या वतीने विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

शहरातील चार ठिकाणी असलेल्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रांत उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी प्राथमिक उपचार, शीतकरण व्यवस्था आणि तातडीच्या वैद्यकीय मदतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना उष्माघाताचा धोका टाळता यावा यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाने विशेष आरोग्य पथकांची नियुक्ती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com