Parbhani: जोरदार पावसामुळे अर्धा रस्ता जलमय; परभणीत राष्ट्रीय महामार्ग, वसाहतीत पाणीच पाणी

Heavy Rain Causes Waterlogging Across Parbhani: परभणीत झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते, सखल वसाहती आणि राष्ट्रीय महामार्ग जलमय झाले.
Parbhani

Parbhani

esakal

Updated on

परभणी: शहरासह परिसरात शनिवारी (ता.२७) सकाळी दहापासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. दुपारपर्यंत अधूनमधून सरी सुरूच होत्या. यामुळे शहरातील प्रमुख रस्ते, सखल भागात पाणीच पाणी झाले. शहरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाळी वातावरण आहे. रोज सकाळ-सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत असल्याने शहर व परिसरात एकीकडे आनंदाचे वातावरण आहे तर दुसरीकडे समस्यांमुळे या आनंदावर विरजण पडू लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com