परभणी : तूर, ज्वारीसह कापसावर आळीचा प्रादुर्भाव, अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने रब्बी हंगामावर शेतकऱ्याची भिस्त

अनिल जोशी
Friday, 27 November 2020

रब्बी ज्वारीचा पेरा जास्त प्रमाणात तर तर तुरीचा जास्त प्रमाणात असून ऐन बहारात असलेल्या ज्वारीची वाढ खुंटा न्याची तर तुरीच्या शेंगा पोखरण्याची भीती व्यक्त केली जात आहे

झरी (जिल्हा परभणी) : परिसरात रब्बी हंगामाचा नुकताच पूर्ण झाला आहे परिसरात सरासरी तुलनेत 90% पेरणी पूर्ण झाली अतिवृष्टीच्या तडाख्यातून खरिपाचे हाती आलेले पीक वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता हवामान बदलामुळे रब्बीतील ज्वारी पिकावर लष्करी आळी तुरीवर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

रब्बी ज्वारीचा पेरा जास्त प्रमाणात तर तर तुरीचा जास्त प्रमाणात असून ऐन बहारात असलेल्या ज्वारीची वाढ खुंटा न्याची तर तुरीच्या शेंगा पोखरण्याची भीती व्यक्त केली जात आहे

परिसरात खरीप हंगामातील पिके ऐन कहाणी आलेल्या असताना सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला परिसरात खरिपाचे पीक बाधित होण्याचे प्रमाण तसेच अनेक ठिकाणी पाणी साचून पिके पिवळी पडली पाण्याखाली येऊ कुजल यामुळे सोयाबीन कापूस  आदी पिके हातची गेली हे प्रचंड नुकसान सहन करून बळीराजा कसाबसा संकटातून बाजूलाच सारून रब्बी हंगामातील पेरणी पूर्ण करून रब्बी हंगामातील पिके चांगली येथील या आशेवर होता रब्बी हंगाम तरी तारेल आणि आर्थिक संकटातून बाहेर निघू अशी आशा शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून जवळपास पेरणी पूर्ण केली.

हेही वाचादेगलूर येथे बारा तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही -

मात्र गेल्या वीस दिवसापासून हवामान बदलामुळे थंडी गायब हो झाल्याने उरल्यासुरल्या तुरीच्या शेंगांना बहार असताना शेंगा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे मोठा फटका बसला तर रब्बी हंगामातील पेरलेली ज्वारीवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव ज्वारीचे पुंग पोखरत असल्याने ज्वारीची वाढ खुंटली उत्पादन कमी होण्याची बीपी शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे

त्यामुळे प्रशासनाने वेळीच  करून उपाय योजना करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन न केल्यास ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही या आळीचा नायनाट करण्यासाठी फवारणी करणे आवश्यक आहे परिसरात रब्बी हंगामातील पेरणी कालावधी लांबल्यामुळे ज्वारीचे पीक क्षेत्र कमी होऊन हरभरा क्षेत्र वाढ झाली आहे  त्यामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या सतत सोबत असणारे संकट संपवणार की नाही अशी चिंता शेतकरी सतवत आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Infestation of larvae on cotton with tur, sorghum, kharif season due to heavy rains parbhani news