परभणी : हातावर पोट असणार्‍या कुटुंबाचे जगणे झाले मुश्किल- कोरोनाच्या काळात काम नाही हाताला.

विलास शिंदे
Thursday, 10 December 2020

देशातभरात आलेल्या 'कोरोना' या संसर्गजन्य महामारिचा भयंकर रोग ( ता.२२ ) मार्च—२०२० रोजी महाराष्र्टातही आला.या संसर्गजन्य रोगाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यशासनाने अनेक वेळा वेगवेगळ्या शहराची परिस्थिती पाहून लाॅकडाऊन केले.तरिही या 'कोरोना' रोगाने अनेकांचे प्राण घेतलेच.

सेलू (जिल्हा परभणी ) : राज्यात 'कोरोना' या संसर्गजन्य रोगाने ( ता. २२ ) मार्च रोजी शिरकाव केल्यानंतर राज्यातले जनजिवनच विस्कळित झाले. त्याचे पडसाद सेलू शहरातही उमटत आहेत. हातावर पोट आसणार्‍या कुटूंबाचे तब्बल नऊ महिण्यानंतरही जगणे झाले मुश्किल.

देशातभरात आलेल्या 'कोरोना' या संसर्गजन्य महामारिचा भयंकर रोग ( ता. २२ ) मार्च- २०२० रोजी महाराष्ट्रातही आला. या संसर्गजन्य रोगाला आटोक्यात आणण्यासाठी राज्यशासनाने अनेकवेळा वेगवेगळ्या शहराची परिस्थिती पाहून लाॅकडाऊन केले. तरिही या 'कोरोना' रोगाने अनेकांचे प्राण घेतलेच. त्यामूळे अनेक कुटूंबाची वाताहात झाली. या 'कोरोना'चा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने अवलंबविलेल्या लाॅकडाऊनमूळे शहराशहरात आपल्या कुटूंबासाठी रोजी रोटी कमवणार्‍या नागरिकांची रोजंदारीची कामेच बंद झाली. तब्बल आठ महिणे त्यांच्या हाताला काम मिळाले नाही. पर्यायाने त्यांचा कुटूंबाचा घर खर्चा इतकी आमदनी त्या कर्त्या पुरूषाला मिळत नसल्याने सद्य:स्थितीत ते कूटूंबच उघड्यावर पडत असल्याचे शहरात पहावयास मिळत आहे.

हेही वाचा नांदेड : सत्तावीस वर्षीय अविवाहितेवर अत्याचार करून खून, बिलोली शहरातील घटना -

व्यवसायिकांकडे मजूरी करणे, हात गाड्यावर भाजीपाला विकणे, सायकल रिक्षा चालवणे आदी हातावरची कामे करून कुटूंबाचे पोट घरातील कर्ते पुरूष मंडळी करित असत गेल्या नऊ महिण्यापासून आलेल्या 'कोरोना' या संसर्गजन्य रोगाने देशभारात थैमान घालून मजूरीचे काम करणार्‍या नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडून टाकले. त्यामुळे तब्बल नऊ महिने घरीच कुठलेही काम न करता मजूर मंडळीनी घरातीलच अन्न धान्न खाऊन कुटूंबाचा उदर निर्वाह केला. परंतु अजूनही हाताला काम मिळणे मुश्किल झाल्याने मजूरांच्या कुटूंबाचे जगणेच झाले कठिण अशी सामान्य नागरिकांतून चर्चा होतांना दिसत आहे. 

गेल्या आठ महिण्यापासून दळणवळणसाठी वाहतूक होती. त्यामूळे आजारी नागरिकांचे हाल झाले. तसेच रोजंदारी करून कुटूंबासाठी रोजी रोटी व्यवस्था करणार्‍या कर्त्या पुरूषांचेही आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. 'कोरोना' या भयंकर रोगाने नागरिकांना कुटूंब सावरण्यासाठी पूढील किती वर्ष लागणार हे येणार्‍या परिस्थितीवरच अवलंबून आहे.

- राजाभाऊ तूकाराम सातपूते, जवळा जिवाजी ता.सेलू, जि.परभणी.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: It was difficult for a family to survive parbhani news