Sun, April 2, 2023

Parbhani News: जिंतूर तालुक्यात बिगरमोसमी पाऊस
Published on : 9 March 2023, 8:56 am
Parbhani News : तालुक्यात मेघगर्जनेसह झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यात सोमवारी (ता.६) मध्यरात्रीच्या सुमारास आणि मंगळवारी (ता.७) सकाळी नऊ व संध्याकाळच्या सुमारास वादळी वारे व ढगांच्या गडगडाटासह काहीवेळ हलका पाऊस झाला.
यामुळे सध्या काढणीस आलेल्या हरभरा, ज्वारी, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच संत्रा, मोसंबीच्या झाडांचा बहार गळून पडला. काही संत्र्यांची झाडे उन्मळून पडली आहेत.
यात उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.