esakal | Parbhani: विधिमंडळाची अंदाज समिती परभणीत येणार
sakal

बोलून बातमी शोधा

विधिमंडळाची अंदाज समिती परभणीत येणार

विधिमंडळाची अंदाज समिती परभणीत येणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : जिल्ह्यात महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती ता. २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत दौऱ्यावर येत असून ते जिल्ह्यातील विविध विभागांकडून राबविण्यात येणारे प्रकल्प व कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करणार आहेत. तसेच विविध विषयांचा आढावाही घेणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपल्या विभागाची सविस्तर माहिती तयार ठेवावी तसेच स्वत: उपस्थित राहून गांभीर्याने कामे करावीत. असे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी गुरुवारी (ता. १४) दिले आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार, अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

जिल्हाधिकारी श्रीमती गोयल म्हणाल्या की, जिल्ह्यातील योजना, प्रकल्प व कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समिती जिल्ह्यात येत असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ९ तालुक्यातील कामांची सविस्तर माहिती तयार ठेवावी. या कामात कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यात समिती दाखल झाल्यानंतर विभागप्रमुखांनी स्वत: हजर राहून क्षेत्रभेटीचे पूर्वनियोजन सुयोग्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

loading image
go to top