Parbhani : मराठवाड्यातील संतांच्या जन्मभूमीचा विकास होणार; आ. मेघना बोर्डीकर

आमदार मेघना बोर्डीकर यांनी उपस्थित केला होता विधानसभेत प्रश्न
मेघना बोर्डीकर
मेघना बोर्डीकरsakal
Updated on

परभणी : राज्य सरकार महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तूंच्या व ठिकाणांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, यासाठी वेगळा निधी सरकारने प्रस्तावित केलेला आहे. परभणी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसा व तीर्थक्षेत्र विकासासाठी हा निधी लवकरच वर्ग केला जाईल, असे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (ता.२७) दिले.

जिंतूर- सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या भागातील संतांच्या जन्मभूमी- कर्मभूमीतील विकासाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी विधानसभेत मंगळवारी केली. जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव हे जन्मस्थान असलेल्या राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज, महाराष्ट्रभूषण मारोतराव महाराज दस्तापुरकर, गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या जन्मगावी, कर्मभूमीत प्रस्तावित असलेली विकासाची कामे मार्गी लावावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच परभणी जिल्ह्यात सव्वाशेंच्यावर पुरातन मंदिरे आहेत.

या मंदिरांच्या जीर्णोद्धार व विकासासाठी सरकारने पाऊले उचलावीत, अशी मागणी केली. यावर बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वास्तूंच्या व ठिकाणांच्या विकासासाठी कटिबद्ध असून, यासाठी वेगळा निधी सरकारने प्रस्तावित केलेला असल्याचे सांगून परभणी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसा व तीर्थक्षेत्र विकासासाठी हा निधी लवकरच वर्ग केला जाईल, असे आश्वासित केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिल्या जाणाऱ्या निधीतून राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांची जन्म भूमी पाचलेगाव, रंगनाथ गुरुजींची जन्म भूमी सोनपेठ, संत मारोती महाराज दस्तापुरकर यांचे समाधी स्थळ या श्रध्दास्थळांचा विकास करावा, अशी आपली मागणी आहे.

- मेघना बोर्डीकर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com