esakal | पोळा सणानिमित्त परभणीची बाजारपेठ सजली
sakal

बोलून बातमी शोधा

pola

पोळा सणानिमित्त परभणीची बाजारपेठ सजली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : शेतकऱ्यांच्या मित्र असणारा बैल याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. येत्या सोमवारी (ता.सहा) पोळा सण सर्वत्र उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे सावट असले तरी वर्षातून एकदाच येणाऱ्या या सणासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. पोळ्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्याची दुकाने देखील बाजारपेठेत सजली आहे. मातीचे बैल विक्री करणारे व्यापारी देखील निरनिराळे व विविध रंगी बैल जोड्या घेवून बाजारात दाखल झाले आहेत.

यंदा पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. मध्यतंरीचा काळ सोडला तर सध्या संपूर्ण जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्साहावर दिसून आला आहे. शेतकरी पोळा सण साजरा करण्यासाठी आतूर झालेला आहे. यंदा पिकेही जोमात असल्याने शेतकरी आनंदी आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना पोळ्यासाठी रंगीबेरंगी झुल, नवीन कासरे व इतर साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांनी परभणीच्या बाजारात गर्दी केलेली दिसत होती. परभणी शहराच्या नवामोंढा भागात विविध साहित्याची दुकाने सजली आहेत.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

त्यातून बैलांसाठी लागणारा साज विक्रीसाठी उपलब्ध आहे. परभणीसह सेलू, जिंतूर, गंगाखेड, पालम, सोनपेठ, मानवत, पाथऱी व पूर्णा या तालुक्याच्या ठिकाणी देखील बैलांच्या साजाची दुकाने थाटली आहेत. या दुकानावर शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटूंबातील बच्चे कंपनीची देखील गर्दी दिसत आहे. शेतातील बैल जोडी, गाय, वासरांना सुध्दा नवीन रंगीबेरंगी झुल घेण्यासाठी उडी पडली आहे. कोरोनाचे सावट असतांनाही केवळ बैल राजाच्या सणासाठी सर्व दुःख बाजूला सारून शेतकरी कामाला लागलेला आहे. लाडक्या बैलराजाला सजिवण्यासाठी लागणारा साज खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. विविध रंगी गोंडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधीत आहेत. कोरोनाचा काळ असल्याने बैलांच्या साजाचे भाव स्थिर असल्याची माहिती साज विक्रेत्याने दिली.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

गौरी - गणपतीची तयारी ही सुरु

पोळा सण साजरा झाला की वेध लागतात ते लाडक्या गणरायाचे गणरायाच्या आगमनापाठोपाठ जेष्ठा गौरीचा सणही येत असतो. त्याची ही तयारी सुरु झाली आहे. बाजारात आतापासून गणपतीच्या मुर्ती व जेष्ठ गौरीचे मुखवटे विक्रीस आले आहेत. बाजाराबरोबरच शहरात पाच ते सहा ठिकाणी गौरीचे मुखवटे घटविले जातात. त्यांच्याकडेही नागरीकांची गर्दी दिसत आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रभाव जास्त असल्याने मुखवटे घडविण्याचे काम कमी झाले होते. परंतु यंदा परत मुखवट्यांची मागणी वाढली आहे असे मुर्तीकारांनी सांगितले.

loading image
go to top