परभणी : जिल्ह्यात 637 वीज चोरांवर महावितरणची मोठी कारवाई

गणेश पांडे
Wednesday, 21 October 2020

दोन दिवस आकडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या 19 गावामधील 637 वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली.

परभणी : जिल्हयातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने गेली दोन दिवस आकडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या 19 गावामधील 637 वीजचोरांविरोधात आक्रमकपणे मोहीम राबविली गेली. ही मोहिम यापुढेही चालूच राहणार असून जिल्हयातील सर्व उपविभागाअंतर्गत येणाऱ्या वीजचोरी बहूल गावांमध्ये वीजकायदा 2003 अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर जास्त भार येवून रोहीत्र  नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी करण्याच्या हेतूने आकडे टाकून वीज वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. या विशेष मोहीमेला गती देण्याच्या दृष्टीने नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांच्या सुचनेनुसार आठ उपविभागा अंतर्गत वीजचोरांवरती मोठयाप्रमाणावर कारवाई केली जात आहे. वारंवार अधीकृतपणे वीज कनेकशन घेण्याबाबत विनंती करुनही अनेक लोक वीजेच्या तारेवर आकडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आल्यानंतर गेली दोन दिवस आक्रमकपणे जोरदार मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत कार्यकारी अभियंता के.एन.जमदाडे, आर.जी.लोंढे तसेच उपअभियंता श्री. नीतनवरे, श्री. मठपती, श्री. नाईक, श्री.लोंढे, श्री. भागवत, श्री. आरगडे, श्री. मेश्राम, श्री. हनवते,  श्री. स्वामी तसेच श्री. उकई आणि शाखा कार्यालयाचे जनमित्र सहभागे होते.

हेही वाचा -  जगातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या द्रास येथे पूर्णेचा जवान आॅनलाईन परिक्षा देत आहे

परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत येणाऱ्या दुर्डी गावामधे 21, कैलासवाडीमध्ये 15, झरी येथे 12 तर उजळंबा गावातील 6 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली तसेच जिंतूर उपविभागातील धाबा,दिग्रस, देवांदा, खरदडी या चार गावातील 219 आणि शेवडी येथे 63, बोरी गावातील 26, चांदणी गावातील 45 वीजचोरांवर कारण्यात आली. पुर्णा उपविभागातील गौर यागावातील 25 वीजचोरांवर, सोनपेठ उपविभागातील धामोणी येथील 61 तर पालम मधील जवळा गावातील 15 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. मानवत उपविभागातील मगरसांगली येथे 10, ईरलाड येथील 12, बोंडारवाडी येथील 10 वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. गंगाखेड उपविभागातील राणीसावरगाव येथेही 23 जणांवर तर बडवणी येथील 40 वीजचोरांवरती कारवाई करण्यात आली. 

वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची

वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकांला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर  आकारणीचे बिल न भरल्यास सबंधितांवर गुन्हाही दाखल होवू शकते. यामध्ये आकडे टाकून विजेचा वापर करणे, शेजाऱ्याकडून अथवा अन्य मार्गाने विजेचा वापर करतांना महावितरण कर्मचाऱ्यांना आढळून आल्यास संबंधित ग्राहकांवर विघुत कायदा 2003 नुसार कारवाई करण्यात येत आहे. वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिध्द झाल्यास तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होवू शकते. 

- प्रवीण अन्नछत्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण, परभणी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: MSEDCL cracks down on 637 power thieves in the district parbhani news