esakal | परभणी : आधीच करोना का कहर त्यात महावितरणने केली शेतीपंपांची विज गुल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

झरी 15 गावांचा शेतीचा विद्युत पुरवठा खंडित

परभणी : आधीच करोना का कहर त्यात महावितरणने केली शेतीपंपांची विज गुल

sakal_logo
By
अनिल जोशी

झरी (जिल्हा परभणी) : झरीसह पंधरा ते सोळा गावांची शेती पंप आजचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे करोना चा कहर आणि त्यात महावितरणने विद्युत पंप बत्ती गुल केली आहे

झरी सह खानापूर, जलालपुर, नांदापूर, मांडवा, दमई वाडी, साडेगाव, संबर दिग्रस, कुंभारी, पिंपळगाव टॉंग, मिर्झापूर, पिंगळी, कोथळा, बोबडे, टाकळी ,जोडपरळी आदी गावांची शेतीचे पंपांचा महावितरण विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहे

वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला सोयाबीनची डबल पेरणी कपाशी लागवड करताना अनेक बोगस निघणे तसेच तुरीला उत्तर नसल्यामुळे तुरीच्या झाडण्यात आल्या त्यातच कसाबसा रब्बीचे पीक शेतकरी घेत असताना कपाशीवर बोंड आळीचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून त्या ठिकाणी गहू आणि ज्वारी घेतली परंतु महावितरणने विद्युत बिल भरा विद्युत पुरवठा खंडित केला जाईल अशी धमकी दिल्यामुळे क प्रकारचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे टाकले. एक तर वाढती महागाई मोलमजुरी चा खर्च त्यामध्येच करोना चा कहर असल्यामुळे शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी त्रस्त असताना महावितरण विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे रब्बीचे आणि गहू आणि ज्वारी चे पीक धोक्यात आले आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांना विहिरींमधून शेंदूर पाणी पाजावे लागत आहे तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आखाड्यावर चे गडी अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे घराकड चा रस्ता धरत आहेत अशा अवस्था शेतकऱ्याची निर्माण झाली असताना अनेक शेतकरी गड्याला समजत असताना रात्री अंधारात साप विंचवाचे भेव वाटत आहे एक तर आम्हाला विद्युत पुरवठा द्या नाहीतर आम्ही आमच्या गावाकडे चाललो अशी भाषा शेतकऱ्यांची घडी बोलत आहेत त्यामुळे शेतकरी तूर्त खचला आहे

वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे झरी युनिटला दिलेले टार्गेट आम्ही पूर्ण करण्यासाठी  शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करत आहोत  खंडित केला आहे यात आमचा नाईलाज आहे

- राहुल घोडके, सहाय्यक अभियंता झरी

मी कपाशी उपटून त्यामध्ये गहू आणि ज्वारी घेतले आहे हे गहू ज्वारी मागच्या असल्यामुळे तिला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे अशावेळेस महावितरण शेतकऱ्याचा अंत पाहत आहे

- अंगत काळुंखे, शेतकरी, झरी

संपादन - प्रल्हाद कांबळे