परभणी- मुदखेड दुहेरीकरणाने वाढणार रेल्वेंची गती

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : मुदखेड ते परभणी दरम्यान ८१. ४३ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे. यातीलच लिंबगाव- चुडावा- पूर्णा- मिरखेल दरम्यान दुहेरीकरणाचे ३१. ९३ किलोमीटरचे ता. १४ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाले. दक्षिण मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त राम कृपाल यांनी या नवीन मार्गावर पॅसेंजर गाड्या चालविण्यास परवानगी दिली. या नवीन मार्गावर ६० किलोमीटर प्रती घंटा या गतीने गाड्या चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. क्रमा- क्रमाने गाड्यांचा वेग वाढविण्यात येईल.
 
मुदखेड ते परभणी या ८१. ४३ किलोमीटर मार्गापैकी ५० किलोमीटरचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले होते. यातील परभणी ते मिरखेल या १७ किलोमीटरचे काम पूर्ण होवून ता. पाच जून २०१७ पासून यावर रेल्वे गाड्या धावत आहेत. दुसऱ्या टप्यात मुदखेड ते मूगट या ९. २६ किलोमीटर मार्गावर ता. नऊ आॅक्टोबर २०१८ पासून, तिसऱ्या टप्यात मालटेकडी ते लिंबगाव या १४. १६ किलोमीटर मार्गावर ता. १७ आॅक्टोबर २०१८ पासून तर चौथ्या टप्प्यात मुगट ते मालटेकडी दरम्यान १०. १७ किलोमीटर मार्गावर ता. २० सप्टेंबर २०१९ पासून रेल्वे गाड्या धावत आहेत.

मुदखेड ते परभणी दरम्यान तीन जंक्शन
 
मुदखेड ते परभणी हा पूर्ण ८१. ४३ किलोमीटर मार्ग पूर्ण करण्याकरिता ३९१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मुदखेड ते परभणी दरम्यान तीन जंक्शन येतात. त्यामुळे या भागात रेल्वे गाड्यांची संख्या जास्त झाल्यामुळे काही गाड्यांना क्रोसिंगमुळे उशीर होत होता. दुहेरीकरणामुळे क्रोसिंगची समस्या सुटली आहे. आता मुदखेड ते परभणी दरम्यान रेल्वे गाड्यांना क्रोसिंगमुळे उशीर होणार नाही.

दमरेचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांचा पाठपुरावा

मिरखेल ते लिंबगाव या ३१ किलोमीटरचे काम करण्याकरिता नऊ दिवस लाईन ब्लॉक घेण्यात आला होता. या लाईन ब्लॉकमुळे बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द, काही अंशतः रद्द, तर काही मार्ग बदलून धावल्या तसेच काही गाड्या उशिरा धावल्या. या कालावधीत नांदेड विभागातील जनतेने रेल्वे प्रशासनास सहकार्य केले या बद्दल दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी विभागातील जनतेचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Drama in Kej
Officials from the Food and Drug Administration conducting a raid on Bapu Maharaj's ashram in Mungsapur.
MLA Vilas Bhumare demand financial aid
Deglur Land Controversy: Inquiry Ordered Into Alleged Irregular Plot Distribution
Marathi News Esakal
www.esakal.com