
परभणी : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेत शहरातील २५ पैकी ११ प्रभागांच्या लोकसंख्येत कुठे किरकोळ स्वरूपात तर कुठे लक्षणीय बदल झाला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येतही फरक पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
महानगरपालिकेने मंगळवारी (ता.१९) शहराची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली. त्यामध्ये शहरातील एकूण २५ प्रभागांपैकी सुनावणी अंती झालेल्या बदलामुळे ११ प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने आपल्या संकेतस्थळावर लोकसंख्येत प्रभागनिहाय झालेल्या बदलाची माहिती नोंदवली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक एक या एम.एस.ई.बी, पावर हाऊस, त्रिमुर्तीनगर, बी. रघुनाथ नगर, सरस्वतीनगर अशी व्याप्ती असलेल्या प्रभागाची लोकसंख्या ९६२ ने कमी झाली असून, हा प्रभाग आता ११ हजार ९०७ लोकसंख्येचा झाला आहे.
या बदलाचा परिणाम झाकीरहुसेन नर, गुलझार कॉलनी अशी व्याप्ती असलेल्या प्रभाग तीनवर झाल्याचे दिसून येते. या प्रभागाच्या लोकसंख्येत मात्र ४९२ ने वाढ झाली असून, आता प्रभाग १३ हजार ६८५ लोकसंख्येचा झाला आहे. प्रभाग चारच्या लोकसंख्येत देखील बदल झाला आहे. त्यामध्ये ६३१ नागरिकांची भर पडून ती आता १२ हजार ५०३ झाली आहे.
प्रभाग क्रमांक पाच या प्रभागाच्या लोकसंख्या ५२५ ने वाढून ती ११ हजार ७०२ झाली आहे. प्रभाग क्रमांक सहा या प्रभागाची लोकसंख्या कमी होऊन ती आता ११ हजार १५४ झाली आहे. प्रभाग क्रमांक सातच्या लोकसंख्येत मात्र मोठा बदल झाला आहे. युसूफ कॉलनी, रहीमनगर, राहुलनगर, अशोकनगर, मकदुमपुरा, सुयोग कॉलनी आदी व्याप्ती असलेल्या प्रभागाची लोकसंख्या एक हजार ८४४ ने कमी होऊन ती आता ११ हजार ७११ झाली आहे.
प्रभाग क्रमांक नऊ या प्रभागाच्या लोकसंख्येत वाढ होऊन ती आता १८ हजार ८५ झाली आहे. प्रभाग क्रमांक १४ या प्रभागाच्या लोकसंख्या दोन हजार १८४ ने कमी होऊन ती आता ११ हजार १७९ झाली आहे. प्रभाग क्रमांक १५ या प्रभागाच्या लोकसंख्येत ३६४ वाढ होऊन ती १२ हजार ६३३ झाली आहे. प्रभाग क्रमांक १७ या प्रभागाची पूर्वीची लोकसंख्या ७७६ ने कमी होऊन ती आता १० हजार ३५५ झाली आहे. तसेच प्रभाग क्रमांक १८ या प्रभागाच्या लोकसंख्येत ४४ ने वाढ होऊन ती १२ हजार ४८५ झाली आहे.
बदल न झालेले प्रभाग
शहरातील १४ प्रभागांत मात्र कुठलेही बदल झालेले नाहीत. त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन, आठ, १०,११,१२,१३, १६, १९ ते २५ या प्रभागांचा समावेश आहे. नविन व अंतिम प्रभाग रचनेचा कुणाला लाभ मिळतो व कुणाचे नुकसान होते, हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.