esakal | शाब्बास परभणी पोलिस शाब्बास : एकाच दिवशी 11 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस

बोलून बातमी शोधा

file photo

त्याच्याकडून 25 तोळे
सोन्याचे दागिने व एक हजार 725 ग्रॅम चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या टोळीनेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या घरफोडी व दरोड्याच्या 11 गुन्ह्याची उकलही झाली आहे.

शाब्बास परभणी पोलिस शाब्बास : एकाच दिवशी 11 घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः गाव, शहरातील वस्त्याची रेकी करुन त्या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका अट्टल दरोडखोरांच्या टोळीचा परभणी पोलिसांनी पर्दाफास केला आहे. या टोळीतील एका सदस्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 25) रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 तोळे
सोन्याचे दागिने व एक हजार 725 ग्रॅम चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या टोळीनेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी केलेल्या घरफोडी व दरोड्याच्या 11 गुन्ह्याची उकलही झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातंर्गत 2020 पासून घरफोडी, दरोडा अश्या प्रकारचे गुन्हे घडले आहेत.  ता. 15 मार्च रोजी चाटोरी (ता. पालम) येथे एका शेतातील आखाड्यावर अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीच्या दागिणे लंपास केले होते. या गुन्ह्यात तब्बल तीन लाख 67 हजार 500 रुपयांचा ऐवज घरफोडी करुन चोरुन नेला होता. पोलिस अधिक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखे मार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. तपास दरम्यान हे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने गोपनीय यंत्रणा सतर्क करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत आरोपी निष्पन्न करण्यात आले. या आरोपीपैकी पोलिसांना एकाची ओळख पटली होती. आरोपी श्रीनाथ उर्फ अशोक कांच्या भोसले (वय 20, रा. शेळगाव ता. सोनपेठ) येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या आरोपीचा पोलिसांनी शोध घेवून त्याला गुरुवारी (ता. 25) रात्री ताब्यात घेतले. त्याच्याकडून  25 तोळे सोने व एक हजार 725 ग्रॅम चांदीच्या वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अशी माहिती पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी दिली. यावेळी सहायक पोलिस अधिक्षक अविनाश कुमार उपस्थित होते.

हेही वाचा - शिक्षक संघटनांपुढे नांदेड जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकारी नतमस्तक, आदेश काढून झाले मोकळे

अट्टल दरोडेखोऱ्यांचे 11 गुन्हे उघड

पोलिसांनी आरोपी श्रीनाथ उर्फ अशोक कांच्या भोसले यास अटक केल्यानंतर पोलिसाच्या चौकशीत बऱ्याच गुन्ह्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पाथरी पोलिस ठाण्यातील घरफोडी व दरोडा, मानवत पोलिस ठाण्यातील जबरी चोरी, गंगाखेड पोलिस ठाण्यातील चार घरफोडी व एक दरोडा, पालम पोलिस ठाण्यातील दोन घरफोडी, पिंपळदरी पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.

या बजावली कामगिरी

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, गुलाब बाचेवाड, फौजदार साईनाथ पुयड, फौजदार संतोष सिरसेवाड, पोलिस कर्मचारी हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, अरुण पांचाळ, किशोर चव्हाण, अझहर शेख, दिलावर खान पठाण, सय्यद मोबीन, संतोष सानप, आशा सावंत, श्रीमती आव्हाड, उमा पाटील, श्री. मुरकुटे, छगन सोनवणे, संजय घुगे, श्री. निळे, सायबर शाखेचे गणेश कौटकर, राम घुले व मानवत येथील फौजदार श्री. तुकडे यांनी ही कामगिरी बजावली.

मोडस् ऑपरेंडीवरुन गुन्ह्याची उकल

चाटोरी (ता. पालम) येथील गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यातील फुटेजद्वारे पोलिसांना या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी लक्षात आली. त्यामुळे गुन्हा करण्याची हीच पध्दत जिल्ह्यातील इतर गुन्ह्यातही असल्याचे समोर आले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे या संदर्भात पोलिसांनी विचारणा केली असता तेही गुन्हे त्यांच्याच टोळीने केल्याचे उघड झाले.

गुन्ह्यातील टोळी निष्पन्न

चाटोरी (ता. पालम) येथील दरोड्याच्या गुन्ह्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अश्याच स्वरुपाचे 11 गुन्हे याच टोळीने केले आहेत. या टोळीतील सदस्यांची यादी निष्पन्न झाली आहे. लवकर ही टोळी अटक होईल. टोळीतील सदस्य हे सोलापूर व परभणी जिल्ह्यातील आहेत अशी प्राथमिक माहिती आहे.
- जयंत मीना, पोलिस अधिक्षक, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे