Extreme Climate: Parbhani Records Season's Highest Temperature at 45.2°C
sakal
परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यात रविवारी उष्णतेची तीव्र लाट अधिक तीव्र झाली होती. आज कमाल तापमान ४५.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तर किमान तापमान २८.० अंश सेल्सिअस होते. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.