Video: भुकेल्यांसाठी शिवभोजनाची थाळी ठरतेय तारक

file photo
file photo
Updated on

परभणी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे गोरगरीब व गरजू लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता. परंतु, या विपरीत परिस्थितीत राज्य शासनाने सुरू केलेली शिवभोजन योजना गरजूंसाठी तारक ठरली आहे. जिल्ह्यातील ११ सेंटरच्या माध्यमातून पहिल्या लॉकडाऊनमध्ये एक हजार ५०० लाभार्थींना याचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे थेट लाभार्थींच्या घरापर्यंत हे भोजन नेऊन दिले जात आहे.

शिवभोजनाचा खऱ्या अर्थाने फायदा झाला तो या लॉकडाऊनच्या काळातच. देशात व राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. तब्बल २१ दिवसांचे पहिले लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे राज्यातील हजारो उद्योग व्यवसाय बंद करण्यात आले. त्यामुळे लाखो लोकांच्या रोजगाराचा प्रश्न उभा राहिला. अनेकांसमोर दोन वेळ जेवणाचा प्रश्नदेखील पुढे आला. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवभोजन योजनेचा या काळात मोठा फायदा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांना करण्यात आल्याने कमी पैशात गरजू लोकांना पोटभर जेवण दिल्या जात आहे.


परभणी जिल्ह्यात एक हजार पाचशे थाळ्या
एकट्या परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात एक हजार पाचशे थाळ्या वाटप करण्यात आल्या आहेत. परभणी शहरात पूर्वीचे तीन सेंटर चालविले जातात. शहरातील प्रत्येक शिवभोजन सेंटरवर शंभर थाळीऐवजी तीनशे थाळी देण्यात आल्या आहेत. तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक सेंटर या प्रमाणे आठ सेंटर सुरू करण्यात आले आहेत. तालुका स्तरावरील केंद्रात ७५ थाळींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या सर्वच केंद्रांवरील उद्दिष्ट पूर्ण होत आहे. याचा अर्थ परभणी शहरात दररोज नऊशे गरजू लोकं या शिवभोजनाचा आस्वाद घेतात, तर प्रत्येक तालुक्यात दररोज ७५ गरजूंचे ही थाळी उदराग्णी शांत करत आहे.

घरापर्यंत शिवभोजन वाटप
जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला शिवभोजन जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावेत, असे आदेश दिले होते. विशेष म्हणजे ज्या लाभार्थींकडे पैसे नाहीत अशांना हे जेवण मोफत देण्याचे विनंतीदेखील प्रशासनाने केली होती. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही लाभार्थींच्या घरापर्यंत जाऊन शिवभोजन वाटप करत आहोत.
- महेश कोकड, शिवभोजन केंद्र संचालक, परभणी
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Medical Negligence Alleged: Woman Dies After Hernia Surgery in Umarga
Massive Anti-Encroachment Drive: 400+ Structures Demolished in Garib Nagar
Prestigious State-Level Award for Principal Dr. Chandrasen Kothawale
NEET Paper Leak Probe: CBI Conducts Secret Investigation in Ambajogai
Marathi News Esakal
www.esakal.com