
या सोहळ्यात लोकसहभागातून चार विवाहयोग्य जोडप्यांच्या संसारोपयोगी साहित्य तसेच आहेर, कपाट, पलंग, गादी, उशी, बेडशीट, वधू व वरांसाठी नवीन कपडे, साडी, विवाह पोशाख, भांडे, दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, शूज, शृंगार किट आदी साहित्य पाठविण्यात आले.
नांदेड : सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे ता. 14 फेब्रुवारी रोजी एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे.या विवाह सोहळ्या प्रित्यर्थ परभणी येथे होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) तर्फे लोकसहभागातून 'रुखवत सोहळा' पद्मावती टॉवर स्टेशन रोड येथे ता. 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात आला.
या सोहळ्यात लोकसहभागातून चार विवाहयोग्य जोडप्यांच्या संसारोपयोगी साहित्य तसेच आहेर, कपाट, पलंग, गादी, उशी, बेडशीट, वधू व वरांसाठी नवीन कपडे, साडी, विवाह पोशाख, भांडे, दागिने, मंगळसूत्र, बांगड्या, शूज, शृंगार किट आदी साहित्य पाठविण्यात आले.
एचएआरसी संस्थेतर्फे रविवारी कन्यादान
ता. 14 फेब्रुवारी रविवारी सायंकाळी सहा वाजता सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथील हॅपी इंडियन व्हिलेजच्या प्रांगणात हा विवाह सोहळा सेवालय संस्थापक रवी बापटले यांनी आयोजित केला आहे. या सोहळ्यात एच. ए. आर. सी संस्थेतर्फे प्रतिनिधी म्हणून डॉ. पवन चांडक हे कन्यादान करणार आहेत.
हेच साहित्य पाठविण्यापूर्वी 'रुखवत सोहळा' स्वाध्यायशक्ती अभ्यासिका पद्मावती टॉवर, स्टेशन रोड येथे आयोजित करण्यात आला. या निमित्त या सामाजिक उपक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणारे सर्व महिला, विविध महिला मंडळ सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. एचएआरसी संस्थेतर्फे सर्व दात्यांचा कृतज्ञता पत्र देऊन सन्मान करण्यात आला. अनाथांच्या विवाह सोहळ्या निमित्त आयोजित या आगळावेगळा उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. आशा चांडक, डॉ. शिवा आयथॉल, पदमा भालेराव, अंजली जोशी, विशाखा हेलसकर, राजेश्वर वासलवार, अनुराधा चंद्रकांत अमिलकंठवार, अर्जुन पवार, डॉ महेश अवचट, बद्रीविशाल सोनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रयत्न केले.
संपादन- प्रल्हाद कांबळे