

Parbhani News
esakal
परभणी: शहरात वाढलेल्या मोकाट श्वानांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर परभणी महापालिकेने अखेर कारवाईचा बडगा उगारत मोकाट श्वान पकडण्याची विशेष मोहीम सोमवारपासून (ता. १६) सुरू केली. पहिल्याच दिवशी पथकाने आठ मोकाट श्वानांना पकडले. तर, आज मंगळवारी (ता. १७) आणखी १८ श्वानांना जेरबंद करण्यात आले. पकडलेल्या श्वानांची नसबंदी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत तीन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पथकात सहा ते सातजण आहेत.