परभणी: शहराची सध्याची अवस्था पाहिली, तर शहरात ना व्यवस्थित पार्किंगची सोय आहे, ना मूलभूत सुविधा. नियम मात्र फक्त सामान्य नागरिकांवरच काटेकोरपणे लादले जात आहेत, अशी संतप्त भावना सर्वत्र व्यक्त होत आहे..दुचाकी किंवा चारचाकी वाहन काही क्षणांसाठी रस्त्याच्या कडेला उभे केले, तरी त्वरित दंड आकारला जातो. वाहतूक पोलिसांची ही कारवाई योग्य असली, तरी ती निवडकपणेच का केली जाते, हा मोठा प्रश्न आहे..US Iran Ceasefire : ट्रम्प यांचा मोठा निर्णय! इराणवर हल्ला थांबवून २ आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू.कारण, याच रस्त्यांवर हातगाड्या आणि अनधिकृत विक्रेते सर्रास कुठेही उभे राहून वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. एकेरी वाहतूक नियमाचाही शहरात अक्षरशः फज्जा उडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी वाहनचालक सर्रास नियम मोडताना दिसतात..मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले प्रशासन कुठे आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या सर्व प्रकारामुळे प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे..Manipur Violence: मणिपूरमध्ये बाँबहल्ल्यात दोन भावंडांचा मृत्यू; गोळीबारात दोन आंदोलकांचाही मृत्यू, पाच जिल्ह्यांत ‘इंटरनेट’ बंद!.नियम सगळ्यांसाठी सारखे असावेत, अन्यथा त्यांचा अर्थ काय? असा थेट सवाल आता विचारला जात आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि वाहनांच्या संख्येचा विचार करता नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था उभारणे, रस्ते मोकळे ठेवणे आणि सर्वांवर समान नियम लागू करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ही अराजकता वाढत जाईल. त्याचा फटका पुन्हा सामान्य नागरिकांनाच बसेल. आता तरी प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देत ठोस पावले उचलण्याची गरज आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.