परभणी : पारंपरिक पिकांना फाटा देत पपई लागवडतून दोन लाखाचे उत्पन्न

अनिल जोशी
Wednesday, 30 December 2020

झरी पासून चार किलोमीटरवर असलेले दुधना नदीच्या काठावरील  जलालपूर येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीधर अशोकराव पुंजारे यांनी साडेतीन एकर शेती त्या शेतीमध्ये त्यांनी दर वर्षी दुष्काळात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग साथ दिली गेल्या

झरी (जिल्हा परभणी) ः सध्या शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करुन उत्पन्न वाढविण्ाचा प्रयत्न करत आहेत.आधुनीक तंत्रज्ञान,नविन पिके यामुळे शेती व्यवसायाला नवे रुप मिळु लागले आहे.जलालपुर ता.परभणी येथील एका शेतकऱ्याने पांरपारीक पिकांना फाटा देत अवघ्या एक एकर पपई लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

झरी पासून चार किलोमीटरवर असलेले दुधना नदीच्या काठावरील  जलालपूर येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीधर अशोकराव पुंजारे यांनी साडेतीन एकर शेती त्या शेतीमध्ये त्यांनी दर वर्षी दुष्काळात सापडणाऱ्या शेतकऱ्यांना नवनवीन प्रयोग साथ दिली गेल्या वर्षभरापूर्वी सात बाय सहा वर पपईच्या आठशे झाडे लावली वर्षभरातच या पपई उत्पादन सुरू होऊन जिंतूर परभणी रोडवर खानापूर या गावाच्या जवळ हॉटेल राजेश च्या बाजूला स्वतः रोडवर पपई विकून श्रीधर पुंजारे यांनी दोन लाखाची उत्पन्नाची अपेक्षा तयार झाली आहे.

हेही वाचापरभणी : किसान संघर्ष जत्था दिल्लीला धडकणार- राजन क्षीरसागर यांची माहिती

पारंपरिक पिकांना फाटा देत साडेतीन एकरामध्ये वर्षभरापासून पपईची लागवड केली होती त्यामध्ये गेल्या वर्षभराच्या नंतर पपई चे चांगले उत्पादन निघून निघू लागल्यामुळे दुष्काळात जाणारा शेतकरी काहीही सावरण्यास मदत निर्माण झाली आहे आजच्या तरुणांना शेतीकडे वळून नवनवीन प्रयोगाची शेती करावी शेती नक्की फायद्यात राहते असे श्रीधर पुंजारे नेहमी सांगत असे या पपई मध्ये त्यांनी विद्यापीठाकडून मार्गदर्शन तज्ञ शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन पपई लागवड केली अल्पावधीतच या पपईचे उत्पादन निघाल्यामुळे व ते स्वतः बागवान असणे देता स्वतः विकल्यामुळे रोडवर विकल्यामुळे उत्पादन व पैसा जास्त प्रमाणात निघण्यास तयार झाला

आजकालच्या नवीन तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये थोडे लक्ष दिल्यास व आधुनिक शेती करुन पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवीन प्रयोगाची शेती केल्यास ती फायदेशीर ठरते.

- श्रीधर पुंजारे, शेतकरी जलालपुर

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Two lakh income from papaya cultivation by splitting traditional crops parbhani news